🔶छडी होती गुरूच्या हाती
तरी पोटात माया पण होती
शिकवण्याची हातोटी होती
संस्कारांची मांदियाळी होती
🔶शाळा म्हणजे गुरुजी व फळा
सुट्टीत बोरं,चिंचा व आवळा
कवितांचा तास नादच खुळा
वाजली घंटा आता घरी पळा
🔶जयंती,पुण्यतिथीची भाषणं
खरंच जाम मजा असायची
चड्डी सावरत,नाक पुसत
सगळ्यांचीच घाई व्हायची
🔶एकच मास्तर चार चार वर्ग..
लीलया हाकत होते
गणित,भाषा,विज्ञान इभूना..
चित्रकलापण शिकवीत होते.
🔶सनावल्या,तहाची कलमे....
इतिहास आवडेनसा झाला.
भरलेल्या हौदाच्या तोट्यानी
गणितात भोपळा मिळाला.
🔶चपला हरवल्या ,मग कधीच नव्या चपला मिळाल्या नाही शनिवारी वर्ग सारवण्यात कमीपणाही वाटला नाही।
🔶शाळेतच आम्हाला फुटल्या मिशा।
आवाज पण झाला घोगरा।
का?कसं?न कळे, पण.....
खुणावू लागला चाफा,मोगरा
🔶पटांगणात ढोपरं फुटायची
पण सेप्टिक व्हायचं नाही
चिंचा आवळे कितीही खाऊन
सर्दी खोकला व्हायचा नाही
🔶डोनेशनचं कम्पलशन नव्हतं
लक्ष्मीचं वसतिस्थान नव्हतं
सरस्वतीचं माहेरघर होतं
शाळा खरं विद्यामंदिर होतं
🔶शाळेचं इनस्पेकशन.........
खूपच घाई शिक्षकांची.
पूर्वतयारी जोरदार..........
प्रश्नोत्तरे पाठ मुलांची
🔶५० वर्षांनी शाळादर्शन झाले
बिचारी खिन्न रडवेली होती
"मोठ्ठं कॉम्प्लेक्स होणार"
अशी पाटी झळकत होती
© मधुकर घारपुरे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔶 शाळेतील फळ्यावर गुरुजी शिकवीत गणित
वेळ जाई डेस्कमध्ये लपवून चांदोबा वाचीत
भूमितीतले वर्तुळ उमटे साऱ्याच विषयात
गोष्टींनी गारुड केले उभ्या आयुष्यात
© Joseph Toscano
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔶प्रेमळ आश्वासक हात बाईंचा पाठीवरून फिरतो
शाळेच्या दिवसांचा आनंद पुन्हा मनी अनुभवतो.
🔶शाळेच्या दिवसात मनाच पाखरु उडत शाळा, बाई, सर यांचा मागोवा घेत रहात.
नीता सुर्यकन्त सावंत.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔶मज जाऊद्या ना शाळेत शिकाया
पाटी पुस्तक लिहा वाचाया
शिकून मीही बनेन मोठी
आधाराची बनेन काठी
नीता गोखले
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान