मला आवडलेले पुस्तक.
पुस्तकाचे नाव- प्लॅटफाँर्म नंबर झिरो.
लेखिका-अनिता नायडू.
हे पुस्तक सामाजिक समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरील मुलं यांच्यावर आधारित आहे. ही मुलं कोण आहेत?आपण त्यांना फलाटावरील मुलं म्हणून ओळखतो. पण ही त्यांची खरी ओळख आहे का?तर नाही.
नेमकी ही मुलं कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात सांगायचं झाल तर ही मुलं म्हणजे शहाण्यासुरत्या समजल्या जाणार्या आपल्यासारख्या लोकांनी नजरेसंमोर दिसत असूनही मनाच्या आणि बुद्धीच्या आड केलेले हे एक वास्तव आहे.
ही मुलं मित्रांच्या सोबतीने बनवलेल्या एका मोठ्या कुटुंबाचा हिस्सा बनलेली असतात जेणेकरून रोजच्या जगण्यासाठी त्यांना आणखी कोणाची गरज नसते.आणखी एक म्हणजे या मुलांची भाषा हिंदीच असते. मुलं कोणत्याही प्रांतातून आलेली असू दे किंवा त्यांची मात्रुभाषा कोणतीही असूदे, मुलं एकदा इथे प्लॅटफाँमवर आली की ते हिंदीतूनच व्यवहार करायला लागतात. प्लटफाँर्म हेच त्यांच घर आणि हिंदी हिच त्यांची भाषा होते.
स्टेशनवर राहणार्या या मुलांच जगणं आणि त्यांचा संघर्ष समजून घेऊन त्यांना चांगले जगायला मदत करणार्या किती तरी संस्था , माणसं आज देशभर तळमळीने काम करत आहेत. जगण्याच्या संघर्षाचे नियम लावायचे झाले तर ही मुलं खरतर
हिरो आहेत. पण आपल्या समाजाने त्यांच मूल्य 'झिरो' केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेशनवरील प्लँटफाँम क्रमांक 'एक' पासून सुरू होतात. तिथे 'झिरो'नंबरचा प्लटफाँर्म अस्तित्वात नसतो. परंतु या मुलांच आयुष्य इथं शून्यातून सुरु होते आणि बहुतेककरून शून्यातच भिरकावलं जाते. म्हणून या पुस्तकाचे नाव सार्थ ठरते.
या मुलांच्या बाबतीत विचार केला तर ही मुलं देशाच्या कोणत्याही प्लटफार्मवर अशा स्थितीत कधीही दिसू नयेत अशी माझी इच्छा आहे. या मुलांच्या जगण्याला तुमच्याआमच्या सारखा सन्मानाचा प्लँटफाँर्म मिळावा असं मला मनापासून वाटतं. या मुलांबद्दल मनात दया, सहानुभूती निर्माण झाली. तेही समाजाचा घटक आहेत ,हे मला पटलं.या पुस्तकाने समाजाच्या एका अंगाचे दर्शन मला झाले.
हे पुस्तक मला खूप खूप आवडले
-रिद्धी सूर्यकांत मोरे.
इयत्ता-आठवी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment