कर्माचा उंबरठा
सांगा हो या सैनिकांनी काय पाप केले
या सर्वांचे जीव अपघाताने नेले ||१||
सुट्टीनंतर रक्षणासाठी ते जात होते
यापुढे देशसेवेचे पुण्य नाही, हे माहीत नव्हते ||२||
त्या बसच्या चालकाचीही काय चूक होती
अपघाताला टाळणे नव्हते त्याच्या हाती||३||
दहशतवाद्याला अपकर्माची वाटली नाही धास्ती
पुण्य सोडून पाप केले, झाली जीवनाची माती||४||
निष्पापांच्या हानीसाठी का दळतात जाती
एका विरुद्ध कृत्य केल्यास अनेकांशी दुरावतात नाती||५||
आतातरी हिंसक वृत्ती या सर्वांनी उधळून
मदतीसाठी हात अनेकांचे येतील उफाळून।।६||
सुधारायचे असल्यास खास भरतील शांततेसाठी शाळा
न पटल्यास ओढा सतत पापाच्या जपमाळा ||७||
शेवटी प्रत्येकाने निर्णय स्वतःच घ्यावा
नियतीच्या न्यायालयात खुलासा करावा||८||
शांती,परोपकार,कृतज्ञतेने जगात मिळेल स्थान
दहशत,हिंसा,कृतघ्न असल्यास मनातून तरी शरमेने नक्कीच खाली जाईल मान
नक्कीच खाली जाईल मान||९||
(पुलवामा हल्ल्यावरून प्रेरित)
कु. यश सौरभ थोरात
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment