Monday, February 25, 2019

लाखात एक माझा फौजी-रिया गुणवरे



लाखात एक माझा फौजी

शत्रूशी लढाई करतो

स्वतः चा जीव गमावतो

देशाचे रक्षण तो करतो 

देशासाठी बलिदान तो देतो

त्याचे हे देशासाठी बलिदान

आपल्याला पाहिजे त्याचा अभिमान

तो देतो आपल्याला जीवन दान

तिरंग्याची वाढवतो शान

रक्षक म्हणून घेतली जबाबदारी

पडणार नाही का तो आजारी

भर उन्हात करतो पहरेदारी

नाही सुट्टी कधी

नाही पाऊस वारा

तुमच्यामुळे आहे आज

सुरक्षित देश सारा

त्याला भीती नाही मरण्याची

फक्त काळजी देशाची 

मोती जसा मोल

तसा देश त्याच्यासाठी अनमोल

देशाचे दुःख 

आपल्या अंगी घेईल

देशाला सुख हे

त्याच्या बलिदानाने देईल

रिया जालिंदर गुणवरे
इयत्ता- ७ वी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

2 comments:

  1. छान ,व्याकरणाचे नियम उत्तम संभाळलेय💐💐💐💐

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर . कायम असेच लिहीत रहा .

    ReplyDelete

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...