पुस्तकाचे नाव - स्वप्नाकडून सत्याकडे ( कल्पना चावलाची कहाणी)
लेखिका - माधुरी शानभाग
लेखिका माधुरी शानभाग यांनी कल्पना चावलाच्या जीवनावरील प्रकाश झोतात या कल्पनेचे वर्णन उत्तम प्रकारे केले आहे. त्या म्हणतात, पहिली अंतराळवीरा तीही भारतीय स्त्री चारही बिरुदे या कल्पनेने अभिमानाने मिरवली.
भातुकलीऐवजी ती सायकलीवरुन हिंडायची, केस कापायची, बाहुलीऐवजी तिने तिच्या वडिलांनी मोठ्या भावाला दिलेल्या विमानाचा ती हट्ट धरायची. सायकलवरुन जातात तिला वा-याची झुळूक खूप आवडायची. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने एरॉनॉटिक्स सारखा विषय निवडला. अनेकांनी तिला दुसरे विषय निवडण्यास प्रवृत्त केले. पण सर्वांनी तुडविलेली वाट आपण तुडवणारी कल्पना कसली. तिला सर्वजण म्हणायचे तूही चुक केलीस, तेव्हा एकदाच ही कल्पना म्हणाली की, “स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधायची दृष्टी अंगी असली की बस्स !”
पदवी घेतल्यानंतर ती मायदेशात नोकरी करु लागली. तिच्या आयुष्यात एकच परदेशात जाण्याची संधी आली आणि त्याच संधीचं तिनं सोनं केलं. परदेशात जाऊन अंतराळविराचे शिक्षण घेऊ लागली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2003 साली कोलंबियाने अवकाश फिरुन यायचं ठरवून ती कोलंबियातून गेली. आयुष्यातील तिची सगळी स्वप्ने साकार झाली. आयुष्यात ही यशस्वी झाली. पण नियतीला तिचं हे यश पहावलं नाही. जमिनीपासून 16 किलोमीटर अंतरावर येताना कोलंबियाचा स्फोट झाला व याकल्पनेचे जीवन आकाशाच्या काळ्या गडत पोकळीत लुप्त झाले. अजून तिला आकाश विंधायचे होते. शास्त्रीय गुपिते शोधायची होती. मायभूमीला भेट द्यायची होती. खूप कांही करायचे होते. पण राख फक्त शरिराची होते. विचारांची व आदर्शाची राख करणारा अग्नी अजून जन्मला नाही, तिने असंख्य भारतीयांच्या मनात तेजाचे कण पेरले ते रुजीतील, फुलतील आणि त्या तारकाफुलातून तिचेचे पंख फडफडतील. फक्त शब्दानेच नव्हे तर कृतीने प्रत्यक्षात केलेला तिचा संदेश अमर आहे, हो खरचं स्वप्नाकडून सत्याकडे जाणारी वाट खरच अस्तित्वात आहे.
या पुस्तकातून कल्पना चावलाची जिद्द, तिचे धाडस, कर्तत्व, स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेले कष्ट हे सर्व आताच्या युवतींनी, तरुणींनी जाणून घेऊन कृतीत आणले पाहिजे. मुलगा काय मिळवेल असे यश कल्पनाने मिळवले. आई वडिलांन नाव मिळवून दिले. तिच्या नावातच खरी जादू होती कल्पना ! म्हणजे एक नवीन गोष्ट करणारी, या कल्पनेच्या अंगी राखेतून उठून पुन्हा भरारी घेणा-या फिनिक्स पक्ष्याची जिद्द होती. शालेय स्तरावर असताना गुणी, मेहनती असणे व नकार कोणाचाही घेऊ नये असा संदेश मला या पुस्तकातून मिळाला.
मनातलं काही -
तिच्या पुढे कुणाचा आदर्श नव्हता म्हणून ती डगमगली नाही. विरोधाने अधिकच उजळणारी, झळाळणारी इंदिरेची जिद्द किरण बेदीचा दुर्दम्य आशावाद, कर्मवाद जे.आर.डीं.ची आकाशाला पालाण घालायची ईर्ष्या आपली लढाई आपणच लढायची असते हा आई वडिलांचा जीवनसंघर्ष वाचलेल्या पुस्तकातले, ऐकलेल्या सुरातले..... एक एक प्रकाश कण वेचत तिने त्याचा ध्रुवतारा बनवला.
त्यावरची नजर न ढळवता ती आपली पावले टाकत राहिली. एक नवी वाट आपण निर्माण करत आहोत याची तिला जाणीवच नव्हती. मागून येणा-या, संधीअभावी तडफडणा-या विरोधाने डगमगणा-या असंख्य अनाम तरुणींसाठी तिने एक लखलखता तारा चमकत ठेवला व ती अंतर्धान पावली. वीराला म्हणजे रणांगणावर मृत्यू यावा असे वाटते. तर या वीरांगणाला अवकाशात मृत्यू हवा असावा. माझी ही समिक्षात्मक शब्दांची फुले या कल्पनेला समर्पित.
- वैष्णवी शिवाजी सातपुते
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment