Tuesday, February 26, 2019

श्यामची आई-मनाली मोडक

श्यामची आई

‘श्यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाले तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वतःच्या हदयातील जिव्हाळा त्यात ओतलेला आहे. आईच्या प्रेमाचा सुगंध या कथेतून दरवळत आहे. श्यामला वाटत असलेली आईबद्दलची कृतज्ञता, तिच्याविषयी असलेली भक्ती ‘श्यामची आई’ पुस्तकात मांडली आहे. तीच भावना आपल्या मनाच्या कोपऱ्यात असलेल्या आईविषयीच्या भावनांना साद घालते. म्हणूनच हे पुस्तक आजही पहिली पसंती आहे.

‘श्यामची आई’ च्या पहिल्या आवृत्तीवर प्रसिद्धीची तारीख दासनवमी शके १९३५ साली प्रकाशित आली,  असा अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीच्या प्रसिद्धीचे साल १९३५ असेच छापले आहे ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे, की शके आणि इसवी सन या दोन कालगणनांमध्ये ७८ वर्षांचा फरक असतो. पण शके ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे ‘शके’ च्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांच्या मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग साने गुरुजींची  पुतणी सुधा बोडा यांनी दासनवमी शके १८५७ चे इसवी सनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल याचा बराच शोध घेतला आहे.

मानली संदीप मोडक
इयत्ता – नववी
शाळेचे नाव - विद्याविकास मंदिर, नेरळ

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...