पुस्तक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
लेखक- राजा मंगलवेढेकर,
मला लहानपानापासूनच वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे मी खूप प्रकारचे चरित्र व गोष्टीचे पुस्तके वाचली आहेत. मला त्यातील सर्वात जास्त आवडलेला पुस्तक म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक राजा मंगळवेढेकर या लेखकांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकात लेखकांनी खूप सोप्या व सध्या भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मांडला आहे.या पुस्तकातील मला एक ओळ खूप आवडली ती म्हणजे आंबेडकर म्हणजे भावी पिढ्यांचा एक उद्धारकर्ता' या ओळीत आपल्याला आंबेडकरा विषयी थोडक्यात माहिती समजते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचा वडिलाचे नाव रामजी सकपाल व आईचे नाव भीमाबाई सकपाल असे होते. त्यांना लहानपणी सर्वजण भिवा या नावाने हाक मारत नंतर त्याचेच भीमराव असे झाले .
बाबासाहेब हे महार जातीत जन्माला आले होते. तेव्हा महार जातीला अस्पृश्य जात म्हणून संबोधले जात होते. महारांनी जर कोणत्याही गोष्टीला हात लावला तर ती गोष्ट बाटली अस सर्व जन म्हणत होते . या गोष्टीचा बाबासाहेबांना खूप त्रास व्हायचा. एकवेळेस बाबासाहेबांना खूप तहान लागली होती ते एका पनवठ्यावरपाणी पियायला गेले तेव्हा त्यांना एका स्पृश्य माणसाने पहिले व त्यांनी व काही माणसांनी बाबासाहेबांना बदडून काढले अशाच काही कारणामुळे बाबासाहेबांच्या मनात हिंदू धर्माविषयी खूप चिड निर्माण झाली. त्यामुळेच बाबासाहेबांनीव असंख्य अनुयायांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करूनब बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेब म्हणाले होते कि 'दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो हा काही माझा अपराध नाही; परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही !...
| १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतातील ब्रिटीश सत्ता संपुष्टात येणार होती आणि घानासामितीचे कामकाज चालूच होते. बाबासाहेब त्या कामकाजात बारकाईने लक्ष घालत होते. घटना-समितीने भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी जी एक लेखन-समिती नियुक्त केली होती तिचे अध्यक्षपद बाबासाहेबांना बहाल करण्यात आले होते. या समितीत सात पद होते पण खर तर बाबासाहेबांनेच मसुदा तयार केला होता. निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला त्याची जागा भारता आली नाही. एक सभासद मृत्यू पावला त्याचीही जागा रिकामीच राहिली. एक अमेरिकेस गेले त्याचीही जागा रिकामीच राहिली. चौथे सभासद संस्थानिकांच्या कामात सतत गुंतलेले राहिले त्यामळे ते सभासद असनही नसल्यासारखे होते. एक दोन सभासद दिल्ली पासून दूर होते त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे तेही उपस्थित राहू शकले नाहीत. शेवती असे झाले कि घटना तयार करण्यासाचा सर्व भर एकट्या डॉ. आंबेडकरावरच पडला. अशा स्थितत त्यांनी ज्या पद्धतीने हे काम पार पाडले त्याबद्दल ते नि:संशय आदरास पात्र आहेत. हा जो त्यांनी तयार केलेला साविधानाचा मसुदा आहे त्यास सदैव ऋणी राहू. डॉ. आंबेडकराला भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीय घटनेचे शिल्पकारच नव्हते तर त्यांना ३ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्याची नावे नेहरूंनी प्रसिद्ध केली त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव स्वातंत्र्य भारताचे ‘कायदेमंत्री म्हणून सर्वत्र झळकले.
डॉ. बाबासाहेबानां वाचनाची खूप आवड होती. त्यांची परिस्थिती बेताची असली तरी त्यांचे वडील रामजी सकपाल हे त्यांना खूप ग्रंथ घेऊन द्यायचे. जेव्हा बाबासाहेबांचा वडिलाकडे ग्रंथ घेण्यासाठी पैसे नसत तेव्हा ते दुसन्याकडून पैसे घेत किवां दागिने विकून बाबासाहेबांना ग्रंथ घेऊन देत असत. अश्याच या वाचनामुळे बाबासाहेबांचा शब्दसाठा व वेगवेगळी माहिती वाढत होती. मला एक वाटत कि जेकाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर बनू शकले त्यात वाचनाचा खारीचा वाटा आहे. बाबासाहेबांनी काही ग्रंथ पण लिहिले आहेत.२-३ ग्रंथ त्यांनी महारांच्या हिंदू धर्मातील वागवनुकीवर लिहिले आहेत.
मी खूप पुस्तक वाचले पण मला हे पुस्तक आवडण्याचा कारण म्हणजे बाबासाहेबांनी केलेली मेहनत त्यांची कामगिरी. या पुस्तकातून माझे काही डॉ. आंबेडकराविषयी असलेले प्रश्न पण दूर झाले मला असं वाटत मी पण खूप पुस्तक वाचव व बाबासाहेबातील काही गुण माझ्यात उतरावेत. हे पुस्तक जगण्यासाठी नवा मार्ग मिळून देऊ शकते अस मला वाटत. हे पुस्तक सगळ्यांनी वाचव अस मला वाटत .
धन्यवाद
हर्ष गोरखनाथ गुड्डेटवार,
इयत्ता-नववी, शाळा
सोनदरा गुरुकुल मा.विद्यालय ‘डोमरी'
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन
No comments:
Post a Comment