सैनिक
सैनिक माझे नाव
आहे मी शूर वीर, आहे मी बलवान
देशासाठी जगतो मरतो आहे मी धनवान.
ठाव नसे मज जात पात , ठाव नसे गुणगान
आम्ही सारे मिळुनी फेडितो माझ्या भारतमातेचे पांग
ऊन असो व कडकड थंडी , फक्त आहे जिंकण्याची धुंदी
छाती फोडून करतो आम्ही शत्रूचे हरण प्राण.
समोर येईल शत्रू त्याची मोडून टाकेन मान
आहे मी बलवान.
गेली वर्षे गेली शतके , वाहिले हजारोंनी प्राण
हृदयापासून तुला माय मानिले
आयुष्य हे तुला वाहिले
तुझीच सेवा , तुझाच हेवा
सैनिक मी तुझाच छावा .
तुजला शत शत प्रणाम
बहीण - भाऊ , आई - बाबा
वाटे हवेत सतत मजला परी
आठवता तुझी आर्त हाक मज
येतो तुझ्या रक्षणास तोडुनी आईची नाळ
सैनिक मी बलवान
मी हि माणूस वाटे मजला
पाहावा सिनेमा , फिरावे जग
खेळावे मुलांशी , झोपावे मग
खावे मनसोक्त आईच्या हातचे खूप
फिरावे मित्रांसोबत करावे ग्रुप
क्षणभर विचार वेगळे जग
आनंदाने भरलेले , आयुष्य जगावे आपल्यांसोबत
वाटे मज हेवा त्यांचा
पण
एका घडीला आठवण तुझी येता
सळसळती हे रक्त अंगीचे
तुझ्या सेवेची लगे मला आस
नको मोह नको माया
गर्व आहे मज मी जपतो तुझी छाया
देशासाठीच आहेत माझे प्राण
भारत आहे माझा अभिमान.
©सोहम क्षीरसागर
इयत्ता-७ वी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment