सैनिक
जय भारती
जय भारती,
खडतर अश्या सीमेवरी,
सज्ज आमुचे पहारेकरी,
नजरेत करार, वृत्ती झुंजार,
संकटे आली जरी अनिवार,
तरी सदैव लढण्यास तैयार
नाही स्वतःची चिंता,
उभे सैनिक सीमेवरी,
देशाचे रक्षण करत
झेलीत गोळ्या छातीवर,
आवाज द्या कुठल्याही क्षणाला,
देशासाठी जीवन हे लावले पणाला
देशाशी असलेले,
नाते यांना जाणले,
देशालाच आपले,
कुटुंब मानले,
नाही जुमानत कधी,
ऊन पाऊस वारा,
तुमच्यामुळेच सुरक्षित,
आज भारत सारा
जय हिंद, जय भारत
©अदिती निलेश मोरे
इयत्ता ५ वी / अ
महाराष्ट्र विद्यालय,
गोरेगाव (प), मुंबई
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment