पुस्तकाचे नाव :- १११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व.
साहित्यप्रकार :- माहितीपर.
पृष्ठे :- २२४
प्रकाशक:- रिया पब्लिकेशन.
आवृत्ती:- ऑगस्ट २०१६
जीवनात त्याच व्यक्ती यशस्वी होतात जे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात. संकटांचा न घाबरता सामना करतात. अपयश हाती आले तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात व जीवनात यशस्वी होतात. काही व्यक्ती, विद्यार्थी जीवनात अपयशी, अयशस्वी होतात.त्यांना प्रेरणा मिळावी, म्हणून अनुजा जोशींनी '111 जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व' हे पुस्तक लिहिले असावे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ:- या पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तकाची ओळख करून देणारे, बोलके व रंगीबेरंगी आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाला साजेसे अशा अक्षरात पुस्तकाचे नाव दिले आहे. हे मुखपृष्ठ पुस्तकाची 90% माहिती सांगून जाते. मुखपृष्ठावर व्यक्तींची नावे वाचून व छायाचित्रे पाहून हे पुस्तक मी कधी वाचतो असे मला झाले होते.
पुस्तकाचे मलपृष्ठ:- बहुतेक पुस्तकांची मलपृष्ठ ही रिकामीच असतात पण या पुस्तकाच्या मलपृष्ठावर परिपूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची छायाचित्रे दिली आहेत. प्रकाशकाचे नाव, पत्ता,ई-मेल याची सविस्तर माहिती दिलेली आहे. मदर तेरेसा, होमी भाभा, दलाई लामा अशा अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींची नावे मलपृष्ठावर दिलेली आहेत.
पुस्तकाचा आशय:- कोणतेही कार्य हे अडथळ्यावाचून पार पडत नाही तर शेवटपर्यंत जे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप संकटे येतात. पण त्या संकटाशी दोन हात करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या111 जगप्रसिद्ध व्यक्तींची माहिती या पुस्तकात दिली आहे.या व्यक्तींनी कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य तसेच संगणक विषयक क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली दिसून येते. या सर्व व्यक्तींच्या यशामागे त्यांनी केलेली मेहनत, त्यांची जिद्द, चिकाटी दिसून येते. कोणतेही गोष्ट, यश, ध्येय हे सहजासहजी प्राप्त होत नाही. तर त्यासाठी अपार कष्ट, मेहनत घ्यावी लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या 111 व्यक्ती.
स्वमत:- '111 जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व' वाचताना व त्यांचे कर्तुत्व पाहताना मला नक्कीच वेळ लागणार होता. त्यासाठी काही निवडक व्यक्तिमत्त्वांचं वाचन मी केले. हे पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्तीकडून प्रेरणा घेण्यासारखी एक एक गोष्ट तरी नक्कीच सापडत होती. जीवनात ध्येयवेड्यापणाचे खूप फायदे आहेत. तेच मला खूप शिकायला मिळाले. कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करू नये. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडेंट होत नाही.त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे मी ज्या व्यक्तिमत्त्वांची माहिती वाचली की, ज्यांनी आपल्या यशासाठी परिस्थितीला, नशिबाला, माणसांना दोष दिले नाहीत तर त्यांनी स्वतः प्रयत्न केले व यशाचे शिखर गाठले.
तसेच पहिल्या विजयानंतर थांबू नये, कारण आपण जर दुसऱ्यांदा अपयशी ठरलो तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळालं होतं हे म्हणण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. याचं या पुस्तकातील उत्तम उदाहरण म्हणजे मेरी क्युरी. 1903 साली मेरी क्युरीला 'रेडिओ ॲक्टिव्हिटीतल्या' शोधासाठी ' नोबेल पुरस्कार' मिळाला. पण इतकेच करून त्या थांबल्या नाहीत तर १९११ साली रसायनशास्त्रातील 'रेडिअम शुद्धीकरणासाठी' त्यांना पुन्हा 'नोबेल पुरस्कार' मिळाला. दोन नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या जगातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत. शिवाय त्यांच्या दोन्ही मुलींना देखील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीकडून मला काहीतरी शिकायला मिळाले, प्रेरणा मिळाली. त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडले.
बोध:- या पुस्तकातून मी असा बोध घेतला की, माणसाकडे जर जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर तो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. तसेच संकटांचा सामना न घाबरता केला पाहिजे.
©सुजल सुदाम महाले.
इयत्ता:-9वी
कुमुद विद्या मंदिर,देवनार,मुंबई.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment