Saturday, February 23, 2019

सैनिक-नंदन कार्ले

             सैनिक

आपल्या भारतीय सैनिकांचा केवढा मोठा मान
त्यांच्यामुळेच आपल्याला झोप लागIते छान।।
सीमेवर झेलत असतात बंदुकीची गोळी।
देशासाठी करतात आपल्या आयुष्याची होळी।।
युद्धामध्ये मोडतात काहींचे हात,पाय,मान।
त्यांच्यामुळेच आपल्याला झोप लागते छान।।१।।

पुलावामाच्या हल्ल्यामध्ये जरी काही जवान झाले ठार।
तरी मानली नाही त्यांच्या साथीदारांनी हार।।
अजूनही घालत आहेत दहशतवाद्यांना कंठस्नान।
त्यांच्यामुळेच आपल्याला झोप चाहते छान।।२।।

जवानांना मारण्याची काश्मिरी करतात हिंमत।
आत्ताच सावध व्हा तुम्हाला मोजावी लागेल किंमत।।
परमवीर चक्र देऊन जवानांचा करतात सन्मान।
त्यांच्यामुळेच आपल्याला झोप लागते छान।।३।।

पाकिस्तान! तू जर आम्हाला त्रास दिलासा।
क्षणार्धात तुझा झालाच खेळ खल्लास।।
आमचे सैनिक आहेत आमच्या देशाची शान।
साऱ्या जगात उंचावली आहे भारताची मान
त्यांच्यामुळेच आपल्याला झोप लागते छान।।४।।

©नंदन सचिन कार्ले
(इ. ७ वी)
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, डोंबिवली

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

1 comment:

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...