पुलवामातल्या भ्याड हल्यात
हुतात्मा झाले चाळीस जवान
पेपरात, न्यूजमध्ये बातम्याच बातम्या
कोण बघतंय कालचं हवामान?ll१ll
शहीद झालेले जवान ते
नव्हते फक्त सैनिक बरं
गोरगरीबांची, शेतकऱ्यांची
मुलं ती हेच खरं ll२ll
सर्वत्र पसरला रागच राग
भय, क्रोध, शोक अनावर
मुलगा होता, नवरा होता
होता तो सैनिक निडर ll३ll
पाकिस्तानचे झेंडे जाळले
बिलकुल आवरत नव्हता संताप
पाकिस्तानला उत्तर द्यायला
एकत्र झाले भाजपा, आप ll४ll
समाजामध्ये तयार झाली
तीन मतं निरनिराळी
एक म्हणाले युद्ध करण्याची
आता आहे आपली पाळी ll५ll
दुसरं मत सरकार विरोधी
सरकारलाच प्रश्न विचारायला आलं
दहशतवाद्यांना हिंदुस्तानामध्ये
येणं कसं शक्य झालं? ll६ll
तिसरं मत अगदीच वेगळं
म्हणालं आम्हालाही वाटते
खंत शांतता पाळू सगळेच जण
युद्ध नको, हवा बुद्ध ll७ll
जैश-ए-महंमदने
स्वीकारली हल्याची जबाबदारी
जम्मू- काश्मीर, पाटणातल्या
लोकांना हवीये मारामारी? ll८ll
जागोजागी, शाळांमध्ये
नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली
पेटून उठले सशस्त्र सैनिक
शत्रू निवारणाची तयारी झालीll९ll
लष्कराला मिळाले सर्वाधिकार
समाजात मात्र शोकच शोक
हुतात्म्यांच्या कुटुंबाच्या हृदयात
पडलं होतं दुःखामुळे भोक ll१०ll
सगळेच म्हणत होते,
पाकिस्तानशी लढताना आनंदात मरू
खोडकर, लहानशी मुलं आम्ही
सांगा बरं आम्ही काय करू? ll११॥
नील अर्चीस मनीष
सहावी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment