एक होता कार्व्हर
कोणतीही गोष्ट सारखी सारखी करणे म्हणजे कंटाळा हा येणारच त्यातून थोडी उसंत मिळावी म्हणजे विरंगुळा छंदा जोपासणे हा अनेकांच्या विरंगुळ्याचा अविभाज्य घटक असतो किंबहुना तो माझा ही आहे. वाचन हा माझा विरंगुळा, गेल्या महिन्यात अनायासे माझ्या वाचनात वीणा गवाणकर यांचा ‘एक होता कार्व्हर’ हे चरित्र आलं त्यांनी त्यात कर्व्हरची उभी केलेली प्रतिमा माला भावली या सर्व कथेला मातृत्वाची नाजूक का होईना पण एक सुंदर झालर वीणाबाईंनी दिलेली मला आढळली आज ती माझ्या शब्दातून तुम्हापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतो.
मातृत्व म्हणजे काय? फक्त जन्म देणे नव्हे तर स्वतःच्या मुलाप्रमाणे सर्व मुलांवर जीव तोडून प्रेम करण. तेच तर केला होता सुझनबाईंनी मोलकरणीचं मरणोन्मुख पोर जीवापाड जपण हेच कितीतरी धैर्याचे काम होते अमेरिकेतल्या ग्रोव्ह पाड्यातला एक पोर आणि त्याची ही कथा.
वीणा गवाणकर यांच्या मातृहृदयी लेखणीतून अवतरलेल हे आत्मचरित्र ‘एक होता कार्व्हर’ १८६०-६२ च्या दरम्यानची ही घटना. दु:खाचे कढ सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळयानी डायमंड ग्रोव्ह दचकून उठले. मेरी! जॉर्ज वॉशिंग्टन कर्व्हर यांची आई, जॉर्ज दोन महिन्यांचा असताना गुलाम पळवणार्यांनी त्यांच्या आईला पळवून नेलं मेरी जिथे काम करायाची ते मोजेसबाबा आणि सूझन यांनी जॉर्ज जबाबदारी घेतली. जॉर्जचे वडीलही अपघातात गेले.
उमदया प्रजातीचा घोडा दरोडोखोरांनी देवून मोझेस आणि सूझेनने जॉर्ज परत मिळवले. मेरीचे दोन महिन्यांचे मरणोन्मुख पोर ते, सार्यांनीच त्याची आशा सोडली होती. जेमतेम श्वासोच्छवास करणार ते काळ मुटूकुळ कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत नव्हतं. पण सुझेनबाईनी आशा सोडली नाही. तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरून लागला. त्याचा तोच दुबळा श्वास पाहून कोणालाही वाटलही नसतं ते पोर जगेल. कुणी त्याला दत्तकही घेतला नसतं! फक्त सुझेनबाई मात्र स्वतःच्या पोराप्रमाणे जीवापाड प्रेम करून मेरीचा पोर जगवत होत्या. इथेच कार्व्हरला मिळाली त्याची आई. त्याचा पहिलं हक्काचा माणूस, त्याच्यावर आईचा मातृत्व पाझरणारी व्यक्ती... सुझेनबाई!
त्यानंतर वर्ष लोटली, जॉर्ज आता १० वर्षांचा झाला आणि त्यांनी शिक्षणासाठी निओशिच्या निग्रो शाळेची वाट धरली तिथल्या निग्रो चर्च मध्ये त्याला भेटली नरीया आत्या. तो तिला आत्या म्हणायचा पण त्याच्या सख्ख्या आईनेही केला नसतं इतक केलं तिने त्याच्यासाठी. रक्त गोठवणार्या त्या थंडीत जॉर्जच्या दुबळ्या जीवाला तीनेच मायेची ऊब दिली. सुझेनबाई आणि मरिया आत्याने जॉर्जला नानाविविध कला शिकवल्या त्याच्यातले गुण, टापटीपापणा, स्वयंपाकाची आवड आणि निसर्गप्रेम त्यांनी ओळखलं. मरिया आत्याची आई झाली जॉर्ज वॉशिंग्टन कर्व्हरची आई. त्याला पहिल्यांदा बायबल शिकवणारी हीच त्याची आत्या.
त्याच्या एकाकी आयुष्यात मरिया आत्या, मेरी, सुझेनबाई, पेणबाई अश्या अनेक माता लाभल्या तरीही त्याच्या आयुष्याला निसर्गानेच त्याच्या आई वडीलयांचे पण निभावले
अधिकाधिक उपभोगच्या हव्यासामुळे एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या पुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत, नैसर्गिक साधनसंपतीचा विनाश करणार्या आजवरच्या आत्मघाती मार्गावर हत्श्पणे वाटचाल कराची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन, विकास, पुनर्भरण उपयोग या शाशव्त कृषिसंस्कृतीच्या स्वीकार करायचा ! तो कार्व्हर ज्याचा आयुष्यच मुळी निसर्गाच्या अधीन होते. या पुस्तकातून काय उडगडलय...
निसर्ग हीच आपली माता आहे असे मानून आपल्या या मातेवर नितांत प्रेम करणारा कार्व्हर या पुस्तकातून वाचकांना उमगतो. एखाद्या गुलाबाप्रमाणे कार्व्हरच्या आयुष्याला अनेक पाकळ्या होत्या. त्याच्या अंगी असलेली कलाकुसर, त्याच्यातला स्वंयपाकी, त्याचं ते मन लावून कपडे धुण, त्याची संशोधकवृत्ती, चौकसपणा, जिद्द आणि निसर्गप्रेम ही भालच तुम्हाला खर वाटणार नाही पण एक छोटासा माळीदादा झाडांशी, फुलांशी इतकाच नव्हे तर टोळे, किडे, छोटे मासे यांच्या सोबत गुणगुणात असे. टोळ उड्या कसा मारतो ? झाड हिरवाचं का? द्राक्ष जांभळीच का? आभाळ उंचावर का असतं ? असे अनेक प्रश्न विचारून तो लोकांना भंडावून सोडी.
आपण असाच चौकस असायला हवा आज पासून पुन्हा आपण कार्व्हरने सांगितलेल्या उंचा टेकड्यांच्या हिरव्यागच्च रानांच्या, फुलांच्या, फळांच्या निसर्गसंवर्धनाच्या वाटेवर चालुयात, शेवटी काय निसर्ग ही देखील आपली आईच आहे.
पार्थ महेंद्र यादव
कुमुद विद्या मंदिर, देवनार, गोवंडी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment