संस्थेतले सैनिक
वेळ नाही काळ नाही
सकाळ नाही रात्र नाही
मग नाही नंतर नाही
सगळं काही आज आणि आता
सण नाही वार नाही
भूक नाही तहान नाही
बघू नाही करू नाही
सगळं काही लगेच अमलात आणता
बरं नाही,शक्य नाही
जमत नाही,कळत नाही
वेळ नाही,माहीत नाही
ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाता
असेच सैनिक संस्थेत वावरत असतात
अनेक आघाड्यांवर अथक लढत असतात
त्यांना लढायला शत्रूची गरज नसते
एकच एक ध्येय पुरेसे असते
प्रियांका कुंटे
उपखजिनदार
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
👌👌
ReplyDeleteछान लिहिलेत ,शुभेच्छा💐💐💐
ReplyDelete