इयत्ता नववी या वर्गाचे २९१७ या साली प्रकाशित झालेले मराठी या विषयाचे पाठ्यपुस्तक
कोणतेही पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भंडार असते. लहानपणापासून जर आईवडिलांनी मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लावली, तर त्यांना पुस्तकाची, वाचनाची गोडी लागते. त्यांना पुस्तके वाचण्यात रस लागतो. मला पण पुस्तके वाचायला खूप आवडतात. पण मला पुस्तकं वाचायची कोणीच सवय लावली नाही. मी स्वतः पुस्तके घेऊन वाचत, त्यांना नीटप्रकारे हाताळत, असे माझे आई-बाबा म्हणतात. माझा सर्वात आवडता विषय मराठी. पण मला सर्व विषयाची पुस्तके वाचायला आवडतात. लहानपणापासूनच मी खूप छोटी छोटी पुस्तक वाचली आहेत.
पण माझे आवडते पुस्तक म्हणजे, इयत्ता नववी या वर्गाचे 2017 या साली प्रकाशित झालेले मराठी या विषयाचे पाठ्यपुस्तक. मी हैद्राबाद या राजधानीच्या शहरांमध्ये शिकते. हे पुस्तक मला २०१८ यावर्षी वाचायला व शिकायलाही मिळाले. मला त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ फार आवडते. कारण त्यावर झाडावरती जसे फळे, पाने असतात, तसेच फळांच्या ठिकाणी पुस्तकांचे चित्रण केलेले आहे. जसे आपण गोड फळांच्या रसाचा आस्वाद घेतो. त्याची मजा घेतो. तसेच त्याठिकाणी पुस्तकातील महासागराएवढ्या ज्ञानाचा, वाचनाचा, रसाचा आस्वाद घेण्यासाठी हा संकेत आम्हाला दिलेला आहे, असे मला वाटते.
छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही सांगण्यासारखे आहे. त्या पुस्तकात त्या पुस्तकाचे संचालक आहेत डॉक्टर सुनील मगर. त्या पुस्तकात खूप काही सांगण्यासारखे आहे. आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचा वापर करतो. मराठी ही महाराष्ट्र(माझ्या) राज्याची राजभाषा आहे. आपले विचार, कल्पना, भाव-भावना समोरील व्यक्ती समोर योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर माझे माझे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढले, भाषेचा विविध प्रकारे वापर करणे मला सहज समजले. या पुस्तकातून वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांची ओळख आम्हाला करून दिली आहे. महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांची आम्हाला ओळख व्हावी, म्हणून बोलीभाषेतील उतारेही दिले आहेत. ते वाचून मला मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे हे लक्षात आले.
“मला अभिमान आहे मराठी असल्याचा”
भाषा हे नवनिर्मितीचे साधन आहे. आम्हाला नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात आमच्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत. भाषाभ्यासाच्या कृतीतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग मला समजले. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यासाठी विविध कृती व नमुने दिले आहेत. त्यांचा मी संपूर्ण अभ्यास केला.
या कृतीतून आमच्यातील लेखनकौशल्य व वांग्मयीन अभिरूची वाढली. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही आम्हाला करावयाचा आहे व त्याचे फायदेही समजून घ्यायचे आहेत. या पुस्तकात अनेक देशभक्तीपर कविता आहेत. जसे ‘वंद्य वंदे मातरम’. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांनी गायलेली गाणी आम्हाला ‘संतवाणी’ आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ‘या झोपडीत माझ्या’ ही कविता आहे, तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आहे. पद्मा गोळे यांची ‘निरोप’ कविता आहे, तुकाराम धांडे यांची ‘वनवासी’ व संदीप खरे यांचे ‘आपुले जगणे आपुली ओळख’ अशा कविता आहेत. या पुस्तकात विविध समाजसेवकांचे, शिक्षणतज्ञांचे जसे; आदर्शवादी मुळगावकर, अनुताई वाघ, अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे बोधपर पाठ आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे स्थूलवाचन या पाठात चार स्थूलवाचन दिले आहेत.
१ – ‘हास्यचित्रातील मुल’ चित्र फक्त चित्रच नसतात तर त्यातून काहीतरी शिकायला मिळते, ही शिकवण मला या पाठातून मिळाली.
2 – ‘बिग 5 च्या सहवासात’ या पाठात दुसऱ्या देशातील जंगलातील आफ्रिकेतील ‘बिग 5’ प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये लेखकाने त्या पाठातून व्यक्त केली आहे. केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयीची पाठात आलेली माहिती रंजक आहे.
3 – ‘इंग्लंडचा हिवाळा’ प्रस्तुत पाठात लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले होते.
4 – ‘विश्वकोश’ विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यवहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्वविषयसंग्राहक मराठी विश्वकोश अधिक आहे.
कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशात मिळू शकतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी, विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या हेतूने स्थूलवाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. या पाठात शब्दकोडे, केशभूषा यांचाही अभ्यास दिलेला आहे.
तसेच या पुस्तकात तंत्रज्ञानाशी मैत्री करून कसे हाताळावे ते सांगितले आहे. उपयोजित लेखन : पत्रलेखन, बोलीभाषांचा परिचय, कथालेखन, जाहिरात, मुलाखत, संवाद लेखन, आत्मकथन, प्रवासवर्णन या सर्व गोष्टी मी केल्या आहेत. माझ्या कथेचे नाव ‘मन हे बावरे’, ‘यात्रेची मजा नंतरची सजा’, ‘ईश्वराचा न्याय’ व मी एका अभियंत्याची मुलाखत पण घेतली आहे. खरंच या पाठ्यपुस्तकांमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. म्हणून हे माझे आवडते पुस्तक आहे.
नाव - आरती महादेव बिराजदार
वर्ग - नववी ‘अ’
शाळा - विवेकवर्धनी कन्याशाळा हायस्कूल
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन
No comments:
Post a Comment