कोसला
मी आजपर्यंत अनेक पुस्तक वाचले. पण त्या मध्ये काही मोजकेच पुस्तक आवडले. त्यातल एक पुस्तक म्हणजे कोसला. कोसला हि एक कादंबरी आहे. हि कादंबरी भालचंद्र नेमाडे या लेखकाने लिहिली आहे. मला हि कादंबरी खूप आवडते. कारण त्या कादंबरीत त्या लेखकाने त्याच्या जीवनात घडलेल्या सर्व घडामोडींचा आढावा घेतला. त्या कादंबरीत लेखकाने त्याच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेचा खुलासा केला आहे. कोसला हे पुस्तक त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला हि पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. हि कादंबरी सर्वसाधारण मराठी वांगमयप्रवाहाची बाहेरील कलाकृती मानली जाते.
कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप, गाव, सगेसोयरे यांना नाकारतो. अश्या व्यक्तिमत्त्वावरील कथा असलेली ‘कोसला’ हि कादंबरी प्रथापित कादंबर्यांचे स्वरूप, विषय, भाषाशैली, संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली. ‘कोसला’ ने मराठी कादंबरीला नवीन दिशा देत ती अधिक खुली व लवचिक केली. आत्मचरित्रत्मक मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. शंभरातील नव्याण्णवास मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाची एवढी भन्नाट सुरु होते. पुढचे पान अजून जबरदस्त वर लिहिलेली ओळ घ्याव. पहिल्या पानावरची कोसला म्हणजे कोण कुठले तरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वतःची कविता सांगायला सुरु करतो.
कथा घडते मुख्यत्वे करून ५९ ते ६३ च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई – आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडण, मुळची त्रास देणारी वडिलांची वृत्ती, शुल्लक गोष्टीतली लांडी लबाडी, खोटारडेपणा व त्यात तयार होत गेलेला संवेदनशील भावनाप्रधान व वरून धटपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्या शब्दात मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टळते.
व्यक्तिमत्व घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर, गॅदरिंगला कल्चरल सेक्रेटरी होऊन पदरचे पैसे खर्च केलेला, सेक्रेटरचे अभ्यासाकडे दुर्लक्ष करत ‘चमकण्याच्या’ मागे असलेला सांगवीकर, घरून येणाऱ्या पैश्याची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या-गेलेल्याला चहा-सिगरेट पाजणारा सांगवीकर, मेस, सेक्रेटरी असतांना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर, इंटरचा व जुनिअरच्या वर्षात वाहत जातो. अनु मेल्याने दुःख पचण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैशाची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात ण खूळखुळावनाऱ्या मित्रासोबत राहूनही एकुणातच सर्वांपासून अलिप्त होत दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो आणि मग शेवटी एकूणच परीक्षेत पेपर सोडून शिकण्याला रामराम ठोकून गावी परत होते तिथे वडिलांचा धंध कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम करत इतर अश्याच शहरातून राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसचे दिवस ढकलणारा आता जे होऊन ते सगळेच भंपक मग का चिंता करा. अश्या पराभूत तत्त्वज्ञानाशी येऊन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कातः होते.
मला हे पुस्तक (कादंबरी) खूप आवडते.
विवेकवर्धिनी शाळा
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन
No comments:
Post a Comment