Tuesday, February 26, 2019

सैनिक-पूजा गायकवाड

सैनिक

नाही स्वतःची चिंता
उभे सैनिक सीमेवर||
देशाचे रक्षण करत
झेलीत गोळ्या छातीवर||१||
आहात तुम्ही म्हणून
जगतो आम्ही आरामात||
चिंता करता देशाची
न गुरफटता नात्यात||२||
नाही जुमानत कधी
ऊन पाऊस वारा||
तुमच्यामुळेच आहे आज
सुरक्षित भारत सारा||३||

नाव – पूजा रुपेश गायकवाड
इयत्ता – ५ वी
शाळेचे नाव – ना. म. जोशी विद्याभवन, गोरेगाव
मु. पो. माणगाव, जि. रायगड

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...