इच्छा तेथे मार्ग-अपयश एक शक्ती
प्रत्येक मानवानला परमेश्वराने अंतःकरण व त्यातील भाव, इच्छा प्रकट करण्यासाठी दिल आहे. पण काही व्यक्ती मनात इच्छा ठेवून ते प्राप्त करण्यासाठी धावपळ करत असतात. काही प्रयत्न करणे सोडून देवाला दोष देतात. इच्छा असेल तर मार्ग आपोआप मिळतो. आपली इच्छा स्फूर्तीदायक, उत्साहित करणारी असावी व ते आपण पूर्ण करू शकतो याचा विश्वास स्वतः असला पाहिजे. मी माझी इच्छा पूर्ण करेन अशी जिद्द असावी मार्ग मिळतोच.
[ऐकण्यासाठी कान दान करा, सेवेसाठी हात दान करा,
भक्तीसाठी हृदय दान करा आणि यशासाठी अहंकार दान करा.]
मी श्री श्री यांची अपयशावर मात हे पुस्तक वाचले व ते मला खूप आवडले. त्यातील एक गोष्ट “इच्छा तेथे मार्ग” ही गोष्ट वाचली. मला ती खूप आवडली. त्या गोष्टीच्या मागचा उद्देश हा स्फूर्तीकारक, प्रोत्साहन देणारा आहे. त्याबद्दल मी सांगणार आहे. तसेच अनेक पुस्तकांमध्ये अति क्लिष्ट भाषा, अवघड विवेचन असते. परंतु हे पुस्तक अत्यंत मुद्देसूद व समजवण्यास अतिशय सोपे आहे.
अज्ञान म्हणजे काय? हे देखील कमी शब्दात रेखाचित्रांसह आपल्याला सहज शिकवते. शेवटी लेखक साधना म्हणजे काय, मोक्षप्राप्तीसाठी आपण कसे अडथळे दूर करू शकतो, स्वतःच त्यासाठी काय प्रयत्न करावे हे सांगताना म्हणतो या मानवी जीवनात प्रत्येक जीव ही वाट चोखाळू शकतो. जी त्याला जीवन मुक्तीकडे नेते. मुक्तीच्या वाटेवर तो चालण्याची कधीही सुरुवात करू शकतो आणि त्यांचे अंतिम साध्य ‘मोक्ष’ मिळवू शकतो.
अपयश हेच यशाच्या मार्गावर चालण्यासाठी बळ पुरवेल. असं कधी होऊ शकत का? होय! असं नक्कीच होऊ शकत. इतिहासामध्ये ठायीठायी असं घडल्याची उदाहरणं आहेत. आजवर अपयश वाट्याला आल्याने मनुष्याने आणखी संकल्प निश्चित केलेत. अपयशामुळे त्याचे इरादे आणखी मजबूत झालेत. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून जर अपयशाशी लढा दिला तर यशश्री मनुष्याच्या गळ्यात माळ घातल्याशिवाय राहणार नाही.
अशा यशस्वी व्यक्तींच्या मालिकेतील नाव, ज्याने समाजातील उपेक्षित परित्यक्ता विधवांना नवजीवन मिळवून दिलं आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवलं. विशेषतः महाराष्ट्र हे त्याचे कार्यक्षेत्र होते. त्यांचा गुरु मंत्र होता – “इच्छा असेल तिथे मार्ग गवसतो.”
“एक इच्छा काही बदलू शकत नाही, एक निर्णय काही बदलू शकतो परंतु एक निश्चय सर्व काही बदलू शकतो.”
एकदा आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं, “आयुष्य नवीन मार्ग शोधले म्हणून मी आयुष्याचा आनंद लुटू शकलो.” वास्तविक महिलांच्या उद्धारामध्येच त्यांचा आनंद सामावलेला होता. ज्या इसमाने स्वतःच जीवनच समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलं, ज्यान स्वतःला विसरून कधीही आपल्या आरामाची, मनोरंजनाची पर्वा केली नाही. देशातील अनाथ आणि दलित वर्ग सुखी व्हावा देश, प्रगतीपथावर असावा ही ज्या व्यक्तीची इच्छा त्यांचे नाव आहे ‘महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे.’
कधीही हिंमत न हरता, विरोधकांशी लढा देत राहणे, त्यावेळी स्वतःच्या ध्येयाशी अढळ निष्ठा ठेवण. या सर्व गोष्टी त्यांना जमले तरी कशा?
नाव - संगीता प्रेमराव नाईक
वर्ग - 9 वी
शाळा-विवेकवर्धिनी कन्याशाळा
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन
परीक्षण मोजक्याच पण प्रभावी शब्दात छान केले आहे 💐💐💐💐💐
ReplyDelete