Tuesday, February 26, 2019

गीतांबोध-गायत्री सरडीवाल

गीताबोध
श्री उदय वामन करंजीकर.

गेल्या काही दिवसांपासून, दिवस काय? महिन्यांपासून मी एकाच पुस्तकात हरवलेय. त्या पुस्तकाने मला वेड लावले आहे म्हणा ना! खरेतर त्याच्याबद्दल लिहायचे म्हणजे हिंदी म्हणीनुसार, “गागर में सागर भरना” असे होईल. त्याचा विषयच इतका महान, त्याचा आवाका इतका आफाट कि काही वाक्य किंवा दोन-तीन पृष्ठांमध्ये त्याबद्दल लिहिणेच हास्यास्पद ठरेल. पानोपानी वा आपण शब्दोशब्दी म्हणू या लेखकाने घेतलेले प्रचंड कष्ट आपणास दिसून येतात.
सामान्य माणसाला देखील तो फार मोठा दर्शनीय नसला तरी पडणाऱ्या प्रश्नांची सोप्या सरळ भाषेत उत्तरे शोधण्यासाठी केलेली उकल आपले सर्वांचे लाडके पुस्तक व ग्रंथच म्हणा हवे तर “गीताबोध” याचे लेखन श्री उदय वामन करंजीकर. ही फक्त हिंदूंची “गीता” ठरत नाही ती होते कुठल्याही जाती, पंथ, धर्माच्या विचारवंत माणसाची नोंद वही. हे पुस्तक वाचायला वयाचेही बंधन नाही.

गीतेतला अर्थ सांगणारी, त्याचे विशाल विवेचन करणारी, त्यातले शास्त्र समजावून सांगणारी अशी अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत. त्या पुस्तकांमध्ये काय होते की ते प्रत्येकात तसे नव्हे. लेखकाने परिश्रमपूर्वक गीता मंथन करून आपल्या समोर लोण्याचा मिठास गोळा ठेवला आहे. आत्मा हा शब्द गीतेत दुसऱ्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत किमान किती वेळा आला आहे पण लेखक त्या सर्वांचा अर्थ आपल्याला एकाच “आत्मा” या प्रकरणात समजावून सांगतो.

आता मला या सर्व गुणांची पारख झालेली आहे. मी जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचते तेव्हा खरोखर संतांचे वागणे डोळ्यांसमोर दिसते. मनात योग्य विचार येतात. देवाचे नामस्मरण होते. अशा गोष्टींमुळे विचारांची देवाण-घेवाण मग तेव्हा कुठे मनाला शांती मिळते व मन आनंदाने बहरते. गोष्टी वाचून त्या समजून घेणं आणि त्यानुसार वागण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रामदास स्वामी म्हणतात, वाईट बुद्धी सुद्धा आपल्याला नको.
ममनी कामना ते नसावी|
कुबुद्धी कुडी वासना निरसावी||
नको संशयो तोडी संसार वेथा|
रघुनायका मागणे हेचि आता||

धन्यवाद!

गायत्री पवन कुमार सरडीवाल
शाळेचे नाव - विवेक वर्धनी कन्याशाळा हायस्कूल
इयत्ता - 8वी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...