Tuesday, February 26, 2019

सैनिक-सारंग गुजर

सैनिक

बघून-ऐकून अतिरेक्यांचे भ्याड हल्ले,

सैनिकांचे आमच्या जीवन संपवले.

बघून घेवू, बदला घेवू, कसले हे खूळ,

प्रशासन अन् सरकारने,

नायोजनाने संपवावे या विकृतीचे मूळ

छिन्नविछीन्न शरीरे बघताना आज,

मलाच माझी वाटावी लाज,

संधी द्यावी, कोडग्यांचा उतरवण्या माज.

किती दिवस नुसती श्रध्दांजलीची फुलं?

नको आता, बास झालं.

करा आम जनतेला समरांगण खुलं.

चला आता उठा आता, नका कचकचू,

या विषारी प्रवृत्तीची नांगी आपण ठेचू.

   
सारंग गुजर, 

६वी क

महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा

धन्यवाद!


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन


No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...