पुस्तकाचे नाव -पिटी चा तास
रमेश तांबे
माझे नाव सिद्धी भास्कर सुर्वे आहे मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव आहे , "पीटीचा तास".त्या पुस्तकाचे लेखक रमेश तांबे आहेत .त्या पुस्तकात खुप सुंदर कवितांचा समावेश आहे .त्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी मुलांना संदेश आहे की; आपण बाहेरचे पदार्थ खाऊ नये वर्गात मस्ती करू नये,मोबाईलचा वापर करू नये इ. मला त्या पुस्तकातल्या दोन कविता खुप आवडल्या.पहिली कविता"आई मला मराठी शाळेत जाऊदे "व दुसरी कविता "शाहिस्तेखान "
पहिल्या कवितेत कविने सांगितले आहे की मला रंगीत गणवेश नको ,शाळेची बस नको क ख ग घ शिकू दे ,गडकिल्ले वेरुळची लेणी , भक्तांची इंद्रायणी, भीमा कृष्णेचा घाट बघायचा आहे. इत्यादी गोष्टी कविला मराठी शाळेत जाऊन करायच्या आहेत. दुसऱ्या कवितेत कविने सांगितले आहे की शाहिस्तेखानाला दिल्लीवरून हुकूम आला की शिवाजी महाराजांना पकडून आणा व मराठा स्वराज्याला चिरडून टाका. शाहिस्तेखान पुण्यात जाताना वाटेत त्यांनी अनेक गावे लुटली, जाळपोळ केली मंदिरे तोडली आणि अत्याचार केला. शाहिस्तेखान 75000 सेना घेऊन पुण्यात आला व लाल महालामध्ये थांबला. त्याने पुण्यात सुद्धा जाळपोळ केली . तेव्हा शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला .ते मध्यरात्री लाल महालामध्ये शिरले .महाराजांनी आपली समशीर उपसली .जागलेल्या खानाची महाराजांना बघुन भितीने तारांबळ उडाली ,व तो घाबरुन सैतान ,सैतान म्हणत पळू लागला .तो खिडकीतून उडी मारताना महाराजांनी वार करून त्याची तीन बोटे कापली. या कवितेतून इतिहास कळतो . मला ही ऐतिहासिक घटना वाचून खूप अभिमान वाटला .मला पी.टी चा तास हा काव्यसंग्रह खुप आवडला; म्हणून मी या पुस्तकावर अभिप्राय लिहिला .
सिद्धी भास्कर सुर्वे
सेवा सदन सोसायटीज गल्स् हायस्कूल गावदेवी मुंबई-7
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
पुस्तकाचे नाव- ओल्या वाळूवरची चित्रे.
लेखक- विष्णु काळे.
मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे. "ओल्या वाळूवरची चित्रे" जसे फुलांचे गुच्छ असतात तसेच हे पुस्तक कवितांचा गुच्छ आहे या कवितांच्या गुच्छामध्ये खूप सुंदर सुंदर कविता आहेत पण मला यातून खूप मोठी गोष्ट कळाली ती म्हणजे 'यश'आणि 'कष्ट' जर लेखकाने कष्टच घेतले नसते तर लेखकाला यश मिळाले नसते जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर थांबून कसे चालेल.
"कर्तव्याचे होई गाणे
तन्मयतेची ताण
पराक्रमाच्या वेलीवरचे
यश सोनेरी पान"
खरच यश असे सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची इच्छाशक्ती आपल्यात असावी लागते.
एखाद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला म्हणजे पुन्हा तो येईलच अस नाही पण येईल सुद्धा. समजा प्रत्येकवेळी विषयाची चांगली तयारी केली म्हणजे यश निश्चित आहेच. थोडक्यात काय तर यशामध्ये जो सातत्य ठेवतो तो यशस्वी होतो. कवी सतत कवितेचा आनंद घेतो,कविता लिहितो. खेळाडू सतत सराव करतो. हुशार विद्यार्थी नियमित अभ्यास करतो. शेतकरी नचूकता शेती करतो. सतत म्हणजे त्यातील सातत्य हे फार महत्त्वाचे असते.
आपणसुद्धा कायम कामाला ,छंदाला वाहून घेतले तर यश आपल्यापासून दूर जाईलच कसे.? त्यासाठी कर्माचे गाणे गायले पाहिजे. हाती आलेले काम तन्मयतेने केले पाहिजे. ती पूजाच आहे असे समजूया. भक्ताला पुजेचा आनंद मिळतो. गायकाला गाण्याचा आनंद मिळतो. त्याचप्रमाणे यशाचा आनंद आपल्यालाही मिळतो. तो आनंद शब्दात कसा व्यक्त करावा ते आपल्या मनाला चांगले माहित असते. यश हे आपल्या जगण्याचे सोन्याचे पान आहे.ते नेहमी जपावे.
कायदा पाळा गतीचा
काळ मागे लागला
थांबला तो संपला
जो थांबेल तो संपेल. यश मिळवायचे असेल तर थांबून कसे चालेल. यशासाठी कष्टाची तयारी हवी. आजवर जे जे कोणी मोठे झाले त्यांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी आपली वेळ फुकट घालवली नाही.
आळशी माणसे कधी यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणून प्रथम आपल्यातला आळस झटकला पाहीजे. मग बघा यशाच्या वाटा कशा सहज सोप्या होतात.
अलंकरण, सौंदर्य शब्दात नसते तर भावनेत असते,आशयात असते. 'ओल्या वाळूवरची चित्रे' हे पुस्तक अशा आशयघन कवितांचा सुंदर गुच्छ आहे,जो आपल्याला अंतर्मुख करतो आणि कल्पनांचे इतके सुंदर नजारे दाखवतो की आपण एखाद्या कसलेल्या लेखकाचे भावविश्व चाळतो आहोत याचे पदोपदी भान येत राहते.
"ओल्या वाळूवरची चित्रे" हे नाव जरा वेगळं वाटेल पण आपल्या जीवनाचं अस्तित्व हे अल्प असतं आणि तात्पुरतं असतं - या वाळूवरच्या चित्रांसारख. त्या दूरवर पसरलेल्या किनार्यावर आपण काढलेल्या चित्राचं अस्तित्वही अगदी अल्प असतं आणि अल्प काळासाठी असतं.
हे कवितांचे पुस्तक मला फार आवडले.
आदिती अशोक वाडकर.
इयत्ता-८वी
सेवा सदन सोसायटीज गल्स् हायस्कूल गावदेवी मुंबई-7
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment