देशासाठी लढता लढता झाले जे शहीद,
मी करते आहे आज त्यांना माझे शब्द सुमने अर्पित ।
आनंदाने आह्मी साजरी करीतो ज्यावेळी दिवाळी,
निधड्या छातीवर त्यावेळी तुम्ही झेलता गोळी ।
उन्हाळा पावसाळा हिवाळा अामच्या साठी कठिण आहे खेळ सारा,
हिमालय सियाचिन वाघावर असतो तुमचा निवारा ।
तुम्ही रात्री जागता म्हणून, आम्ही असतो निवांत,
तुमच्या मुळेच आज आमचा काश्मीर आहे शांत ।
किती सांगावी सैनिकहो, तुमच्या शौर्याची गाथा,
शतदा तुमच्या समोर माझा झुकतो आहे माथा ।।
अभिलाषा साळुंखे
इयत्ता-६वी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment