Tuesday, February 26, 2019

जि.प.शाळा,मानिवली,रायगड

आमचे सैनिक

तुम्ही आहात म्हणून

जगतो आम्ही सुखात

चिंता आहे देशाची

न गुंतता नात्यात

न गुंतता नात्यात...

तुम्ही जुमानत नाही कधी

ऊन, पाऊस, वारा

म्हणूनच तुमच्यामुळे आहे आज

सुरक्षित भारत सारा

सुरक्षित भारत सारा...

नाही काळजी स्वतःची

उभे सैनिक सीमेवर

देशाचे रक्षण करता करता

झेलता तुम्ही गोळ्या छातीवर

झेलता तुम्ही गोळ्या छातीवर..!

-कु.दिव्या नंदकुमार डायरे

 इ.६ वी

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

भारताचे सैनिक

नाही कधी केली स्वतःची चिंता

देशाच्या रक्षणाकरता

उभे सैनिक सीमेवर

झेलीत गोळ्या छातीवर...

आहात तुम्ही म्हणून

जगतो आम्ही आरामात

तुमच्याच भरवशावर

आम्ही राहतो आमच्याच कामात...

नाही केला कधी संसाराचा विचार

नाही नडला कधी तुम्हांस ऊन,पाऊस, वारा

तुमच्यामुळेच आहे आज

सुरक्षित भारत सारा

सुरक्षित भारत सारा...!

-कु.संध्या शशिकांत गवळी

इ.६ वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

देशाचे वीर

या देशाच्या आकाशात

सीमेवर जेव्हा लढाई होतात

धडाडणाऱ्या ज्वाला भडकतात

आगीत स्वतः सैनिक संग्रामात...

स्वतः जळण्यासाठी आणि जाळण्यासाठी

हसत्या खेळत्या आयुष्यातूनी

क्षणातच उठून गेलास

देशरक्षणाची हाक येताच

तत्परतेने तू निघालास...

आपला विजय होईलच

या विजयाचे श्रेय तुलाच

मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा

माझे शतशः वंदन तुलाच

माझे शतशः वंदन तुलाच...!

-कु.कामिनी रमेश गायकर

इ.७ वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

जय जवान

जवान आहेत सिमेवरती

म्हणून आपण आहोत भारतभूमीवरती

झेलली गोळी छातीवरती,

तरी लढत होते सीमेवरती,

लढत होते सीमेवरती

ना केला विचार संसाराचा

ना केला विचार मुला बाळांचा

ना केला विचार आई वडिलांचा

ना केला विचार बहीण भावाचा

डोळ्यासमोर होता निशाण तिरंग्याचा,

निशाण तिरंग्याचा

शहीद झाले ते जवान भारतासाठी 

पण शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते ते भारतमातेसाठी ,भारतमातेसाठी

-कु.कोमल रविंद्र डायरे

इ.७ वी

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

भारतपुत्र

सैनिक आहेत या भारत देशाचे

भारत मातेचे आणि धरती मातेचे

दिवस-रात्र ते लढत आहेत

आपल्यासाठी आणि भारत मातेसाठी

सैनिक लढतात खडतर सीमेवर

म्हणून आपण झोपतो मऊमऊ गादीवर

त्यांच्यामुळेच आपण सुखात झोपू शकतो

राहू शकतो आणि कामे करू शकतो

सैनिकांना नसते स्वतःच्या घरादाराची पर्वा

असते फक्त त्यांना भारत मातेची पर्वा

सैनिक असतात दिवसभर जागे

म्हणूनच आपण लागतो सुखाच्या मागे

सैनिक आहेत या भारत देशाचे

भारत मातेचे आणि धरती मातेचे...!

-कु.तेजल कृष्णा गवळी

इ.६वी

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक मित्र

सैनिक आहेत छान

देशासाठी दिले बलिदान।।

सैनिक आहे माझा मित्र

सारख राहील मनात त्याचेच चित्र।।

सैनिक आहेत छान

कीर्ती केली महान।।

सैनिक आहेत छान

शत्रू आहेत घाण।।

-कु.नंदिनी राजू पेमारे

इ.४थी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक माझे

माझे सैनिक आहेत छान

देशासाठी दिले बलिदान।।

सैनिक आहेत माझे मित्र

डोळ्यापुढे त्यांचेच चित्र।।

माझे सैनिक आहेत महान

देशासाठी दिले बलिदान।।

चिंता न करती स्वतःची 

लढाया जाती शत्रूशी

हरपून देहभान।।

-कु. आचल हनुमान गवळी.

इ- ४थी

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

वीरमरण

असा कसा मित्रा माझ्या

गेलास रे तू

शरीर ठवले सुखरूप

अन केलास काळजावर घाव।।

तुझं माझं असा कधी मी

केला नाही रे भेदभाव

लहानपणीची मैत्री आपली

मी अगदी जीवापाड जपली।।

तुझ्या मनातली मैत्री भावा

कशी के रे संपली

वेगळा खेळ मांडलास तू

आपला खेळ मांडून।।

माझ्या मनातील मैत्री तुझी

कधी नाही जाणार सोडून

जमलं तर परत ये

जिथे आपण नेहमी बसायचो।।

एकमेकांचं दुःख जाणून 

जिथे अश्रू पुसायचो

आज तू देशासाठी पत्करले वीरमरण

मलाच का रे मित्रा रचावे लागले तुझे सरण।।

-कु. केतन केशव कराळे.

इ - ७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिकदादा

माझ्या सैनिक दादा रे

जीव तुझा हातावर।।

      

सीमेवर जाताना नाही केला

तू आईचा विचार

नाही केला तू बाबांचा विचार

ना केलास तू पत्नीचा विचार

ना केलास त्या लहान लेकरांचा विचार।।

विसरून गेला तू त्यांना

देशसेवा करता करता

बनू नाही शकला तू 

त्यांच्या वृद्धपणाची काठी।।

लढलास तू फक्त या

मायभूमीसाठी

मनात होता देशाचं अभिमान

नाही घाबरला

खुल्या छातीने सामना केला।।

कसा लढलास तू

प्राण दिले तुझे या देशासाठी

कशी देऊ तुझ्या देहास आदरांजली।।

दुःख होते आम्हा

आणि आनंदही होतो आम्हा

कारण तू फक्त लढलास देशासाठी

कसं विसरू आम्ही गातो तुझं गुणगाण

फक्त देवाकडे एकच प्रार्थना

मोक्ष लाभो तुझ्या आत्म्यास

मोक्ष लाभो तुझ्या आत्म्यास।।

-कु. मानसी मनोहर डायरे.

 इ- ७वी.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक आम्ही भारतमातेचे

सैनिक आम्ही या देशाचे

सैनिक आम्ही या भारतमातेचे

सैनिक लढतात सीमेवर

म्हणून आपण झोपतो गादीवर

जो आपले घरदार विसरून

सीमेवर जातो 

त्यालाच आपण सैनिक म्हणतो

सैनिकाला नसते घरदाराची पर्वा

फक्त भारत मातेची पर्वा

जे सैनिक आपल्या प्राणाची पर्वा न करता 

दिवसेंदिवस लढतात

त्या सैनिकांना माझा कोटी कोटी प्रणाम।।

-कु.करिष्मा कृष्णा गवळी

इ.५वी

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

बलिदान

सैनिक गेले सीमेवर

गोळी झेलली छातीवर

देह ठेवला मरणावर

हार मानली नाही मरस्तोवर

देशासाठी दिले बलिदान

हीच खरी मानवतेची शान

देशासाठी अर्पिले आपले पंचप्राण

बलिदान देऊन झाले ते महान

झाले ते महान..!

-कु.शुभम शंकर पाटील

इ.५ वी


इयत्ता- ४ थी ते ७ वी

"रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानिवली"


धन्यवाद!


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...