द मदर आय नेवर न्यू
लेखिका:-सुधा मूर्ती
प्रकाशक:- पेंग्विन बुक्स हाऊस इंडिया
आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांमधील मला 'सुधा मूर्ती' यांचे 'द मदर आय नेवर न्यू' फारच आवडले. हे पुस्तक 'सुधा मूर्ती' यांनी लिहिले आहे. व 'पेंग्विन बुक्स इंडिया' ने सन २०१४ मध्ये प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाबाबत वेगळे आहे ते म्हणजे यात दोन कथा आहेत, म्हणजे वाचण्याची मजा देखील दुप्पट होते. पुस्तकाचे नावच आपल्याला या पुस्तकातील कथांबद्दल माहिती देते. 'द मदर आय नेवर न्यू' या विषयावर दोन्ही कथा अवलंबित आहे. पहिल्या कथेमध्ये 'व्यंकटेश' नावाच्या पात्राची मुख्य भूमिका आहे. वेंकटेश हा एक साधारण पण श्रीमंत माणूस असे. तो त्याच्या बायको, मुलगा व मुलगी अश्या छोट्या परिवारात सुखी राहतो. त्याची बदली हुबळीला होते व तेव्हा त्याला एके दिवशी त्याच्या सारखाच दिसणारा माणूस भेटतो. प्रथमच त्याला या गोष्टीचे नवल वाटते. त्याला या गोष्टीबाबत फार उत्सुकता देखील वाटते. मग जेव्हा तो या गोष्टीची सखोल माहिती काढत असतो तेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या भूतकाळाबद्दल कळते. आता प्रश्न असा उरतो की ,"तो त्याच्या वडिलांच्या कर्माचे कर्ज फेडू शकेल का?" " जर फेडले तर त्याच्या आईला हे मान्य असेल का?"
तर दुसऱ्या कहाणीत मुकेश ला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला दत्तक घेतली आहे असे कळते. मग तो त्याच्या खऱ्या जन्मदात्रीला शोधावयास निघतो. या शोधात त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल खूपच वेदनादायी सत्य कळते. त्याच्या बालपणी एवढा काही घडलं असेल अशी त्याला कल्पना देखील नसते. आता प्रश्न असे उरतात की," तो त्याच्या खऱ्या आईला स्वीकारु शकेल का? त्याच्या खऱ्या आईला त्याला भेटल्यावर कसे वाटेल? त्याला ज्या आईने वाढवले त्या आईला आपल्या मुलाला दूर जाताना पाहून किती वेदना होतील? "त्याने कुठच्या आईला खरी आई मानवे? जिने वाढवली की जिने जन्म दिला?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती. आई व मुलांमधील प्रेमाच्या या गोड नात्याचं सुधा मूर्ती यांनी फार सुंदर वर्णन केले आहे . सुधा मूर्ती त्यांच्या शब्दांच्या जादूनी आपलं मन जणू काही हेराहूनच घेतात .एक आई असताना आपल्याला एवढे प्रेम करते तर दुसरी आईदेखील किती प्रेम करेल? मग ती आपल्याला भेटली असो वा नाही.
ज्या लोकांना पुस्तके वाचण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अगदी सर्वोत्तम आहे. हे पुस्तक वाचण्याचा माझा अनुभव फारच अप्रतिम होता. हे पुस्तक वाचताना असे वाटते जणू काही आपण त्या पत्रांमधीलच एक आहोत.
ऐश्वर्या संदीप सावंत
सेंट अॅनिस हायस्कुल
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment