मला आवडलेले पुस्तक-प्रकाशवाटा
बाबा आमटे यांच्याकडून समाजकल्याणाचा वारसा मिळालेले, त्यांच्याप्रमाणेच लोककल्याणासाठी वाहून घेणारे आणि आदिवासींच्या अंधारमय जीवन प्रकाशमान करणारे डॉ.श्री प्रकाश आमटे यांचे " प्रकाशवाटा " हे पुस्तक अत्यंत वाचनीय व संग्राह्य आहे.
प्रकाशवाटा या पुस्तकात डॉ.प्रकाश आमटे यांचा संपूर्ण जीवनपटच अतिशय समर्पक व योग्य शब्दात उलगडून दाखवला आहे.या पुस्तकात त्यांचे बालपण,शिक्षण कार्यक्षेत्राची निवड व त्यातून आलेले प्रत्यक्ष अनुभव यांचे दर्शन घडते. बाबांकडूनच डॉ.प्रकाश आमटे यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले.बाबांनी उभे केलेले आनंदवन, हेमलकसा प्रकल्पाद्वारे आदिवासींना जीवनदान देण्याच्या कामी त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
या पुस्तकात आदिवासींसाठी काम करत असताना त्यांच्या जीवावर बेतलेले प्रसंग आले. आदिवासींचे प्रश्न सोडवताना त्यांना शिक्षण,आरोग्य, स्वच्छता,रोजगार,तंत्रज्ञान,सल्लागार अशी अनेक कामे करावी लागतात.या पुस्तकातील कथेवर आधारित " प्रकाशवाटा" हा चित्रपट ही काढण्यात आला.प्रचंड इच्छाशक्ती व सतत दुसऱ्याबद्दलची वाटणारी तळमळ याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.
एका थोर व्यक्तिमत्त्वाचे,धैर्याच्या उत्तुंग महामेरूचे दर्शन आपणास या पुस्तकात होते आणि समाजाचा घटक या नात्याने आपण समाजासाठी काही तरी करावे असा विचार आपल्या मनात डोकावू लागतो.म्हणून हे पुस्तक मला फार फार आवडते.
कु. अनुजा सतीश उडतेवार
स्मिता पाटील विद्या मंदिर,
वारजे माळवाडी,
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment