श्यामची आई
श्यामची आई हे स्वर्गीय . सानेगुरुजींच मराठीतील सर्वात सुंदर पुस्तक आहे . इतक्या वर्षात कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केला आहे. अजून आपण लहानपणी वाचलेला पुस्तक आपल्या मुलाला वाचायला मिळावे म्हणून धडपड करतात. २४ जानेवारी १८९९ रोजी साने गुरुजींचा जन्म झाला . गुरुजींच्या आईचे नाव ' यशोदा ' होते . लहानापासून गुरुजींचे त्यांचा आईवर अतोनात प्रेम होते . श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपापल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत ; त्यांचा आईने केलेले संस्कार, प्रत्येक गोष्टी मागची शिकवण ; त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला . त्यांनी हे पुस्तक सुंदर , सुगंधी व सुरमरित्या , तथा पवित्रतेने लिहिलेले आहे ; असे मी विनयाने म्हणू शकते. व्ह्रदयातील सारा जिव्हाळा यात ओतला आहे . हि गोष्ट वाचताना माझे डोळे शतवार ओले झाले . हृदय गहिवरून व उचंबळून आले होते . माते बद्दलचे प्रेम , भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना हे पुस्तक वाचून माझ्या मनात उत्पन्न झाली . तुरुंगात असताना दिवसा काम करून व रात्री जगन्माता , भारतमाता व जन्मदात्री माता यांचा विचारात लिहिलेले हे पुस्तक आहे.
श्यामची आई हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधन ठरलेले आहे . प्रेम व संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहे. आपल्या बोलण्यातून मुले जे शिकतात त्या पेक्षा जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांतून ती शिकतात ; याची गुरुजींचा आईला जाणीव होती. श्यामच्या जीवनाचा झरा ( प्रवास ) ठेवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. " फुलांच्या कळ्या झाडावर तोडू नये ; त्यांना झाडावर नीट फुलून द्यावे. झाड म्हणजे फुलांची माता. मुक्या कळ्या तोडल्या कि झाडांना अतिशय वाईट वाटते " , अशी शिकवण आईने सानेगुरुजींना दिली. लहानपणी खेळून आल्यावर श्यामने अंघोळ केली आणि पायाच्या तळव्यांना माती लागू नये ; म्हणून त्याने आईला पदर धोंडीवर पसरण्यास सांगितले . आईला त्याचा हट्ट विचित्र वाटला . पण तो पुरवताना श्यामची आई म्हणाली ," अरे पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस , तसा मनाला घाण लागू नये म्हणूनही जप ". श्यामच्या आईने हे साधेच बोल ; पण त्यात किती अर्थ भरला आहे . अश्याच अजून अनेक प्रसंगातील आईच्या बोलण्यातला अर्थ श्यामला समजला आणि त्यातून श्याम घडत गेला. असाच आईच्या संस्कारामुळे श्याम निर्भय बानू लागला. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. सत्याग्रह चळवळीत संदेश सांगत निर्भय बनलेला श्याम वाऱ्यासारखा फिरू लागला. स्वतंत्रयुद्धात त्यांनी उडी घेतली. याच कर्तृत्वामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगात विनोबा भावे यांनी गीतेवर दिलेले प्रवचन त्यांनी तशेच्या तशे लिहून घेतले. तुरुंगात त्यांच्या हातून एक महान कविता कागदावर उमटली " खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे | " हळुवार भावनांचे मनोहर काव्य आईने श्याम च्या मनात ओतले त्याचे हे परिणाम. पुढच्या अनेक पिढ्यांचे जीवन शुद्ध व विशाल बनविण्याची संजीवनी श्याम च्या आईमध्ये आहे.
' मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र ' म्हणून गौरविल्या गेलेल्या ' श्यामची आईला ' मानाचे अभिवादन !
भक्ती सावंत
विवेक विद्यालय,गोरेगाव
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment