सैनिक
सैनिकांनो आहे
मी तुमचा भक्त
तुम्ही सांडता
मायभूमीसाठी रक्त
बनायचे मला आता
सैनिक फक्त
भारताला बनवू आपण
सारे मिळून सशक्त
आईबाबांचे स्वप्न
करायचे मला साकार
देशाला देऊया
सारे मिळून आकार
शपथ घेऊन सांगतो
सैनिकांनो तुमचे रक्त
जाऊ देणार नाही
कधीच वाया
दुश्मनांना पडायलाचं
लावीन मी पाया
खरचं सांगतो सैनिकांनो
तुम्हीच आहे महान
तुम्हीच आहे
भारताची शान
तुषार उध्दव शिंदे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
बाँर्डवरती तैनात राहून
देशाचे रक्षण तो करित असतो
त्यांच्या मुळेच आपण
सारे आनंदाने हसतो
घर दार आईबाप मूल बाळ
सारे सोडून देशासाठी प्राण देतो
आपण सारे एकमेकांना भांडून
एकमेकांचे प्राण घेतो
सैनिक बाँर्डवर
रात्रभर जागतो
देशभक्त आम्ही
त्यांच्यासाठी प्रार्थना
करीत असतो
सैनिक होऊन मी
देशाचे रक्षण करीन
बलिदान त्यांचे
ध्यानी मनी धरीन
ओमकार भगवान शिंदे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
सैनिक देशाची रक्षा करतात
सैनिक जीवन त्याग करतात
दिन रात्र सैनिक लढतात
थंडी असो कि पाऊस
हार मानत नाही
आपल्या जीवाची परवा न करता
आपल्या देशासाठी लढणाऱ्या
त्या चाळीस सैनिकांचे
बलिदान वाया जाणार नाही
सैनिक आपले शूरवीर
वाघावानी धाप टाकणारे
न कुणासमोर वाकणारे
पण असे पाकिस्तानने धोक्याने
मारणे आम्हाला चालणार नाही
सैनिकांना भितात दुश्मनही
जे समोर कुठं पाठीमागे
हमला करतात
देशासाठी लढणाऱ्या या
शूरवीर भक्तांना सर्व
भारतवासी वंदन करतात
ऋतुजा राधाकिसन धोत्रे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
ते देशासाठी लढले
ते शहीद झाले
ते भारत मातेला
वंदन करुन गेले
नाही फिरले मागे
झाले ते शहीद
सीमेवरती केली रक्षा
नव्हती त्यांना कशाची अपेक्षा
तिरंग्यासाठी करत
होते चळवळ
बाँम्बस्पोटाने होते
सर्वांना हळहळ
धन्य त्यांची देशभक्ती
जगात श्रेष्ठ आपल्या
सैनिकांची शक्ती
पवन अशोक राठोड
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
अमर राहिला सैनिका तू
प्राण अर्पण करूनी
भारतभूचे रक्षण करत होता तू
सीमेवरती लढूनी
शहीद झाले सैनिक
2019 होता सन
सुनी केली आईची ओटी
दुखवलं आईचं मन
भारतावर असा वार होणार
असे कुठे होते मनात
पाकिस्तानाला वठणीवर आणू
हेच प्रण आहे आता कणाकणात
ते लडतात सीमेवरती भारतवासी
आहोत आम्ही सुरक्षित
अमर झालेल्या सैनिकांचे हो
देहाचे तुकडे उडाले या भूमीत
दुखते टोचले एकेकाच्या
मनाला
पाकिस्तान व भारत
अलग का असे
विचारायचंय जनाला
सैनिकांनो तुमच्यामुळे
पूर्ण होत नाही
दुश्मनांचे मनसुबे
भारतीय सारे पाठीशी
तुमच्या वीरांनो सदैव उभे
शिवकन्या बद्रीनाथ शिंदे
इयत्ता ७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
भारत भूमिचा रक्षण करणारा सैनिक
लढतो देशासाठी हा वैज्ञानिक
नाही करत स्वतःच्या जीवाची पर्वा
देशासाठी करतो मोठमोठ्या गर्जा
आठवण येते सीमेवर लढताना
आठवण येते प्राणार्पण करताना
या आईची या भारत भूमीची
येथे आठवण सीमेवर लढताना
माझा कोटी कोटी प्रणाम या
भारत भूमीच्या पुत्राला
नमन त्या आईला जिने दिले
देशासाठी आपल्या मुलाला
प्राजक्ता पांडुरंग पटेकर
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
भारताचा सैनिक आहे हा खंबीर
त्याचा एक एक निर्णय असतो तो गंभीर
या निर्णयातही आपण लावू हातभार
त्यामुळे सैनिक करेल पाकिस्तान वर वार
भारताचे सैनिक करेल मग पाकिस्तानवर वार
शपथ घेतो तो सैनिक की मानणार नाही कधी हार
आमचे पिकांची कुणाशी कधी वैर नाही
वाटी जाईल त्याची मात्र खैर नाही
बदला घेऊआताही बांधली आम्ही खूणगाठ
आमच्या सैनिकांचा सारा भारत थोपवटीतो पाठ
आरती वैजनाथ शिंदे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
लढत होते ते आपल्या
डोळ्यात शत्रूची घेऊनी
ये भारत भूमीचं संरक्षण
करायचे ते सीमेवरती लढूनी
भारतावर हल्ला झाला तेव्हा होते २०१९सन
भूमीचे रक्षण करताना आलं त्यांना वीरमरण
पाकिस्तानच्या हल्ल्यात कुणाचे कपडे
तर कुणाचे धडाचे अवयव उडाले
कुणाचे सापडेल रक्तबंबाळ कपडे
कुणाच्या शरीराचे तुकडे जमा करावे लागले
पाकिस्तानच्या हल्ल्यात किमान ४० जणांना आलं मरणं
भारतात होते दुःखाचे अश्रू तर पाकिस्तानात आनंदी होते सर्वजण
डोळ्यात आग भरूनी दुसरे सैनिक तयार मारण्यास पाकीस्तान्यांना
एक एक अश्रु चा बदला घेऊ मग श्रद्धांजली देऊ मृत्युंजय सैनिकांना
कोणी सैनिकांनी शपथ घेतली पाकिस्तानला ठार मारण्याची डोळे कोरडे पडले भारतीयांची काही फक्त पाकिस्तानांना मातीत पाहण्याची
रडत होते ते मुलं तर कुणाची होती दीड वर्षाची
वाईट किती छाया पडणार नाही त्यांच्या वडिलांची
लेक मोठा झाला तरी ओटी ओसाड झाली आईची
आठवण उडत राहील गगनात फक्त मृत्युंजय वीराची
भारतात होता दुखाचा धुरूडा पाकिस्तानात होती होळी आनंदाची
सैनिकांना ठाणले पाकिस्तानात दुःखाचा धुरूडा तर भारतात होळी आनंदाची पेटवण्याची
2019 ला कोणी डोळ्यात लपवले अश्रू
क्षमता नव्हती कुणाची पाकिस्तानचा आतंक खत्म करायची ही संकल्पना फक्त मनाची
ही संकल्पना फक्त मनाची
वैशाली काकासाहेब क्षीरसागर
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
भारताचा सैनिक आहे हा खंबीर
त्याचा एक एक निर्णय असतो तो गंभीर
या निर्णयातही आपण लावू हातभार
त्यामुळे सैनिक करेल पाकिस्तान वर वार
भारताचे सैनिक करेल मग पाकिस्तानवर वार
शपथ घेतो तो सैनिक की मानणार नाही कधी हार
आमचे पिकांची कुणाशी कधी वैर नाही
वाटी जाईल त्याची मात्र खैर नाही
बदला घेऊआताही बांधली आम्ही खूणगाठ
आमच्या सैनिकांचा सारा भारत थोपवटीतो पाठ
आरती वैजनाथ शिंदे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
वीर सैनिक
चौरे चाळीस च्या बदल्यात 4000 घेऊ
या पाकिस्तानला तळापासून उकडून घेऊ
इतकाच दम होता तर पुढून यायचे असते
असे गिधाडासारखे वार करायचे नसते
भारतीय सैनिक तुमच्यासारखे पाठीमागून वार करणारे नव्हते ते
वाघासारखी झेप घालणारे होते ते
प्राणार्पण करणारे सैनिक भारत मातेचे वीर होते
स्वातंत्र्य आधीपासून देशासाठी प्राण अर्पण करणारे शूर वीर होते
पाकिस्तानला हे कळाले असते तर
आमचे आज विर शहीद जिवंत असते
तुम्ही थोडातरी विचार करून पाहिले असते तर तुम्हाला भारताचे गुन्हेगार मानले नसते
एका धान्याच्या कणासाठी तुम्ही भरकटले असे नसते
देश आपला आपला विकसित राष्ट्र असते
ते तर शहीद होऊन अमर झाले पण
तुम्ही आमच्या मनात कायमचे दुश्मन निर्माण केले.
रोहित विष्णू जाधव
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मी भारताचा सैनिक
सैनिक आम्ही या देशाचे
सैनिक आम्ही या देशाचे
देशाची सुरक्षा करणार आम्ही
आमच्यासारखे बना तुम्ही
देशाला प्राणार्पण करणारे आम्ही
शत्रूला तोंड देणारे आम्ही
मी भारताचा सैनिक
मी या देशाचा सैनिक
काय मिळाले सैनिकांना मारून
उलट दिला तुम्ही आमचा देश एक करून
समोरुन वार करणे आहे आमची जात
लावून तर बघा आता पुन्हा हात
नंदिनी विठ्ठल चव्हाण
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
सैनिक आहे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
देशाचे रक्षण करतात म्हणत
नाही कधी महान
मी सैनिक बनायचे
वचन देतो तुम्हाला
वापस येण्याचे कधी
म्हणत नाही ते सैनिक
त्यांची शिस्त आहे फार
ते वाहतात रक्त देशासाठी
ते माझे सैनिक होय
सैनिक आहे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
देशाला त्यांचा आधार
तुषार रामचंद्र शिंदे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
सैनिक आहे शूरवीर
ते मागे फिरणारे नाही
शहीद होऊन ते गेले
भारतमातेचे पुत्र अमर झाले
सैनिकांचे घरदार त्यांचे
बॉर्डर वर असते
माय बाप मुलं-बाळं
त्यांच्याजवळ नसते
अंगात यांच्या वाघाचे बळ असते
कुणीही त्यांच्या पेक्षा मोठे नसते
मनोज गुलाब चव्हाण
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
मी आत्ताच आर्मीला श्रद्धांजली दिली
ज्यांनी खऱ्या अर्थाने देशभक्ती केली
देशासाठी लढले ते सैनिक अनाम राहिले
सुखी संसाराचे स्वप्न त्यांचे पूर्ण व्हायचे राहिले
मागुन वार करणाऱ्यांचा बदला आम्ही घेऊच
पुन्हा वार करून दाखवा मग तुम्हाला दावुच
युद्धात सांगा जिवंत कोण राहते
काश्मीरच्या पाण्यातून
आमच्या सैनिकांचे रक्त वाहते
अमरनाथ कैलास शिंदे
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सैनिक
सैनिकांनो मी शपथ घेईन
मी पण सैनिक होईन
सर्वात महान
कार्य आहे सैनिकांनो तुमचे
संरक्षण करत असतात तुम्ही
आमचे
सैनिकांनो तुम्ही देशाचे खरे हिरो
बाकी सगळे तुमच्यासमोर झिरो
आतंकवादी करता तुमच्यावर चढाई
तुम्ही करत असता देशासाठी लढाई
म्हणून म्हणतो सैनिकांनो
मी शपथ घेईन
मी मोठा झाल्यावर सैनिकच होईन
रोहित अजय चव्हाण
इयत्ता-७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
जि प प्रा शा भिंदोन
केंद्र सातारा
ता जि औरंगाबाद
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन
खूप सुंदर रचना आहेत. उच्च प्रतिभेचा अविष्कार
ReplyDelete