मला आवडलेले पुस्तक पुस्तकाचे नाव 'गीता बोध'
गेल्या काही दिवसांपासून, दिवस काय महिन्यांपासून मी एकाच पुस्तकात हरवलेय. त्या पुस्तकाने मला वेड लावले आहे म्हणाबना! खरे तर पुस्तकाबद्दल लिहायचे म्हणजे हिंदी म्हणीनुसार, 'गागर मे सागर भरता' असते होईल. त्याचा विषयच इतका गहन, त्याचा आवाका इतका अफाट की काही वाक्ये किंवा दोन-तीन पृष्ठांमध्ये त्याबद्दल लिहिणेच हास्यास्पद ठरेल. पानोपानी वा आपण शब्दोशब्दी म्हणू या लेखकाने घेतलेले प्रचंड कष्ट आपणास दिसून येतात.
ते पुस्तक सर्वप्रथम आपणास त्याचा बाह्य आकार, प्रकार, उत्तम छपाई या गहन विषयाला सोपे करुन समजविण्यासाठी दिलेली चित्रे, रेखांकने आणि लेखकाची सुलभ करुन शिकविण्यासारखी भाषा यानेच मोहून टाकले, असे हे पुस्तक आहे. आपल्याला अगदी सामान्य माणसाला देखील तो फार मोठा दर्शनिक नसला तरी पडणा-या कटू प्रश्नांची सोप्या सरळ भाषेत उत्तरे शोधण्यासाठी केलेली उकल, आपले सर्वांचे लाडके पुस्तक वा ग्रंथच म्हणा हवे तर -
'गीता बोध' याचे लेखक आहेत. 'श्री. उदय वामन करंजकर,
मी कोण आहे? माझे अस्तित्व काय? मी या जगात का आलो? हे विश्व म्हणजे काय? असे असंख्य प्रश्न कोणाला पडत नाहीत? पण नुसती गीता वाचून आपल्याला कळते का? साधे आजारपण आले, दुःख झाले, अपयश आले? कष्ट करावे लागले तरी आपण सहज विचार करतो. मनात संशयाचे काहूर उठते, प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! यांचा गुंता वाढत जातो. खरेच देव आहे का? असलाच तर तो सर्व व्यवस्थित का करत नाही? आणि तसेच याउलट मला इतके काही देवाने दिले आहे पण तरीही मला काय सलत राहते? समाधान म्हणजे काय? ते कुठे मिळते? कसे मिळते? माणूस एवढाच का जगतो? मृत्यु म्हणजे काय? असेही अनुत्तरीत प्रश्न आपल्याला छळत राहतात आणि नेमक्या याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास केलाय.
श्री. करंजकरांनी या पुस्तकाचे सर्वात मोठे श्रेय म्हणजे नेमके काय? असेल तर ही फक्त हिंदूची 'गीता' ठरत नाही, ती होते कुठल्याही जाती, पंथ, धर्माच्या, विचारवंत माणसाची नोंदवही. हे पुस्तक वाचायला वयाचेही बंधन नाही. जेवढे ते मला लावले, तेवढेच ते माझ्या मुलाच्याही पसंतीस उतरले. गीतेतला अर्थ सांगणारी, त्याचे विशद विवेचन करणारी, त्यातले शास्त्र समजावून सांगणारी अशी अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत त्या पुस्तकांमध्ये काय होते की, ते प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावत पुढे जातात. या पुस्तकात तसे नव्हे. लेखकाने परिश्रमपूर्वक गीतामंथन करुन आपल्यासमोर लोण्याचा मिठास गोळा ठेवला आहे. लेखकाची एकच धारणा, परिकल्पना मनात ठेवून, त्या एकाच "शब्दाचा" संपूर्ण गीतेमध्ये धांडोळा घेतो.
वानगीदाखल तेराव्या अध्यायापर्यंत किमान ४१ वेळा आला आहे. तो म्हणजे 'आत्मा' हा शब्द. पण लेखक त्या सर्वांचा अर्थ आपल्याला एकाच 'आत्मा' या प्रकरणात समजावून सांगतो, आणि ते शब्द किंवा धारणा देखील लेखकाने सुज्ञपणे अतिशय तर्कशुद्ध विचार करुन, एक एक पाऊल टाकावे तसे क्रमानुसार आपल्यापुढे आणलेत, जसे आधी आत्मा मग ईश्वर, पुढे ब्रह्म असे एक एक टप्पा आपण ओलांडत जातो. नेहमीच्या पुस्तकात व या पुस्तकात हाच एक मुलभूत फरक आहे. जणू एखाद्या अनोळखी वाटेवर चालताना स्थानिक लोकांची मदत होते, अडथळत, चुकत - माकत पुढे जाणे किंवा स्थानिकांच्या मदतीबरोबरच आपल्या जवळ एखादा अचूक नकाशा असणे. तसेच अनेक पुस्तकांमध्ये अति क्लिष्ट भाषा व दुर्बोध अवघड विवेचन असते. परंतु हे पुस्तक अत्यंत मुद्देसूद, नेटके व समजण्यास अतिशय सोपे असे लिहिले आहे. त्यामुळे हे पुस्तक विशेषतः आजच्या अहोरात्र कामात बुजून गेलेल्या व इतर काही अवांतर वाचण्यासाठी वेळच नसलेल्या पिढीला फार उपयुक्त ठरेल, असे मला वाटते. आजची पिढी जास्त ताणाखाली जगत आहे. त्यांचे ताणतणाव कमी करुन जीवनाचा खरा अर्थ समजाविण्यास या पुस्तकाची सोपी, सुटसुटीत, सुबक चित्रमय भाषा आणि शेवटी ठळक अक्षरांत मुख्य मुद्दे देण्याची लेखकाची कला तरुणांना नक्कीच आकर्षित करेल.
समृद्धी म. कुलकर्णी
इयत्ता – ८वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मला आवडलेले पुस्तक-माझी जन्मठेप
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ||
उदारचरितानां तु वसुर्धव कुटुम्बकम् || या उक्तीप्रमाणे, हे माझे आहे, हे दुसयाचे आहे. अशा प्रकारचा भेदभाव कोत्या (क्षुद्र) मनाची माणसे करत असतात. उदार हृदयी लोकांसाठी तर सारे विश्वच माझे कुटुंब आहे, असे सावरकरांनी आयुष्याच्या अंतापर्यंत मानले.
प्राचीन काळापासून वेद, उपनिषदे यामधून ब्रह्म, जीव जगत याचा विचार केला गेला. महाभारत, रामायण, भगवद्गीता यासारखे धर्मग्रंथ त्यावेळी लिहिले गेले आहेत. चौदा रत्ने, चौदा विद्या, चौसष्ट कला, चार वेद, सहाशस्त्रे, अठरापुराणे यांची माहिती त्याकाळपासून आपल्याला मिळत आहे. पण आज त्यांची जागा पुस्तकाने घेतली आहे.
स्वातंत्रवीर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' या महान ग्रंथाची पुस्तक रुपाने निर्मिती केली. 'माझी जन्मठेप' हे एक पुस्तक नसून या महान नेत्याच्या जीवनातील सुख-दुःखाची एक शोकांतिका आहे. परकीय साम्राज्य सत्तेविरुद्ध बंड पुकारल्याच्या आरोपावरुन श्री. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपींची शिक्षा ब्रिटीश सरकारने दिली. सावरकरांच्या जीवनावरील हे पुस्तक माझ्या जीवनातील माझे आवडते पुस्तक आहे. चांगल्या पुस्तकाविषयी नेहमी चांगलेच बोलले जाते. 'स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकाचे मी स्वागत करीन, कारण चांगली पुस्तके असतील तरच स्वर्ग निर्माण होतो' असे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी म्हटले आहे. पुस्तक म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा एक साबण आहे. कारण समाज प्रबोधनाचे कार्य हे एक पुस्तक करीत असते.
'माझी जन्मठेप' या पुस्तकाद्वारे भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी आपले परखड विचार मांडले आहेत. या पुस्तकाने समाजामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे माझे हे सर्वांत आवडते पुस्तक आहे. परकीय गुलामगिरीत असताना वीर सावकरांसोबत ३८ आरोपी होते. ब्रिटीश सरकार विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी शस्त्रास्त्रे जमवून कट करणे हा आरोप त्यांच्यावर होता.
२४ डिसेंबर १९०९ ला आरोपपत्र दाखल करुन ब्रिटीश सरकारने २४ डिसेंबर १९१० ला निर्णय दिला की, सावरकरांना जन्मभर काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी. "बंदीस देवशाळा | बेडीस पुष्पमाला हातास मानू झोला | काळाशी खेळू खेळा आम्ही स्वराष्ट्र संत | करु मातृभू स्वतंत्र
वारुन पारतंत्र्य | करु राष्ट्रभू स्वतंत्र'' असा मूलमंत्र मानून सावरकर शिक्षा भोगण्यासाठी तयार झाले. दुसरा खटला त्यानंतर चालून त्यातही त्यांना ३० जानेवारी १९११ ला दुसरी जन्मभर काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. शिक्षा भोगत असताना सावरकरांनी जन्मठेपेचे कठोर सत्य असलेले, भयानक स्वानुभव सांगणारा हा ग्रंथ बंदिवासातून १९२४ मध्ये सुटल्यावर लिहिला.
'माझी जन्मठेप' या पुस्तकामध्ये अंदमानमध्ये असताना काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ज्या गोष्टी घडल्या त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना देण्यात आली होती. सावरकरांना ही शिक्षा भोगायला जाण्याआधी पत्नीला भेटण्याची मुभा दिली. पन्नास वर्षांच्या म्हणजे जन्माच्या ताटातुटीच्या आधीचा हा शेवटचा निरोप होता. 'या जन्मांत तुमची आमची पुन:भेट होणार नाही' असे हृदयद्रावक शब्द त्या माऊलीने म्हटलेले अखेरचे शब्द होते. काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना पोटभर अन्न नसायचे, पुरेशी झोप मिळत नसे. प्रतिदिन एक पौंड काथा कुटण्याचे काम दिले जात होते. दिवसभर राब राब राबवून घेतले जायचे. या प्रकारच्या कितीतरी घटना सावरकरांनी 'माझी जन्मठेप' या पुस्तकामध्ये लिहिले आहेत.
ब्रिटीश अधिका-यांनी हे पुस्तक वाचले व त्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला. सावरकरांनी या सरकारी धोरणाचा कडकडून निषेध केला. २२ ते १९४६ ला वीर सावरकरांच्या 'माझी जन्मठेप' या पुस्तकावरील बंदी उठविण्यात आली.
'हिंदुराष्ट्र' ग्रंथमालेचे पाचवे पुष्प म्हणून सवत २००३, खिस्ताब्ध १९४७ मध्ये परचुरे पुराणिक यांनी 'माझी जन्मठेप' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. परंतु पुन्हा ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधीचा वध झाला आणि त्यात एक आरोपी म्हणून सावरकरांना गोवले गेले आणि 'माझी जन्मठेप' या पुस्तकावर पुन्हा संकट निर्माण झाले. पुस्तके वाचायला लोक दचकू लागले. पण नंतर काही वर्षांनी हे प्रकरण निवळल्यानंतर पुन्हा पुस्तकाची प्रकाशने निघाली. गुजराती, कानडी, बंगाली आदी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले. त्यानंतर १९६३ मध्ये समग्र सावरकर वाङमयात 'माझी जन्मठेप' हा ग्रंथ छापला गेला. 'प्रबोधिकेच्या राज मान्यतेपेक्षा ही लोकमान्यता अधिक मोलाची आहे' असे वीर सावरकरांनी म्हटले होते. 'माझी जन्मठेप' हा ग्रंथ केवळ बंदिवासातील कष्टांचे हृदयद्रावक वर्णन करणारा नाही तर भयंकर आपत्तीतही माघार न घेता किंवा शरण न जाता झुंजत रहाण्याची स्फूर्ती देणारा आहे. हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारकांनी किती कष्ट सहन केले त्याचे वर्णन या महान ग्रंथामध्ये लिहिले आहे.
अशा या 'माझी जन्मठेप' ग्रंथरुपी पुस्तकाद्वारे प्रत्येकाच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा संदेश लिहिला जातो. हे पुस्तक वाचताना आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी, तीला परदास्यातून मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीराने के बलिदान दिले, तरुणांच्या साहाय्याने नव भारत घडविण्याचे साहसी कार्य बजावले त्या थोर नेत्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम निर्माण होते. एक ज्वलंत देशभक्ती, जाज्ज्वल्य देशनिष्ठा, अतुल शौर्याची गाथा असलेलं त्यांचं जीवन होतं. म्हणूनच त्यांच्याबद्दल सर्वांना आदर निर्माण होतो.
| 'माझी जन्मठेप' हे एक पुस्तक नसून आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी कारणी लावणाच्या सर्वस्वाचा होम करणा-या आणि असीम कष्टमय जीवनाला सामोरे जाणा-या या थोर वीर सावरकरांच्या महान कार्याचे एक जीवंत स्वरुप आहे. या थोर ग्रंथरुपी पुस्तकाचे माझ्या जीवनामध्ये एक मानाचे स्थान आहे.
दिक्षा सुमंत तोंडवळकर
इयत्ता :- नववी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मला आवडलेले पुस्तक-कोसला
मी आज पर्यंत अनेक पुस्तके वाचली, पण माला त्यातली काही मोजकीच पुस्तके आवडली त्यातील एक पुस्तक म्हणजे कोसला. 'कोसला' ही एक कादंबरी आहे. ही कादंबरी ‘भालचंद्र नेमाडे' या लेखकाने लिहिली आहे. मला ही कादंबरी खूप आवडते कारण त्या कादंबरीत लेखकाने त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेचा खुलासा केला आहे.
'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या 25 व्या वर्षी प्रकाशीत झाले. कोसला ही एका खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाच्या तरुणाची आत्मकथा आहे.
कोसला या कादंबरीचा नायक ‘पांडुरंग सांगवीकर' या नैतिकतेच्या आधारावर बाप, गाव, सगेसोयरे यांना नाकारतो. कोसलाने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचीक केली. आत्मचरित्र मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.
मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रीकाच एवढी भन्नाट सुरू होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त असते. कोसला म्हणजे 'कोस.'
कुठल्यातरी सांगवीनामक गावातला पांडुरंग स्वत:ची कथा सांगतो. कथा घडते ती पुण्यामध्ये. पण त्या आधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरात होणारी भांडण, वडीलांची लबाडी, खोटारडेपणा आणि त्यात तयार होत गेलेला भावनाप्रधान व वरुण घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर उभा रहातो तेथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावकडचे बुजरेपणा टाळत व्यक्तिमत्व घडवण्याच्या मागे टाळत जाणारा सांगवीकर, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चमकण्याच्या मागे असलेला सांगवीकर, सगळ्यांना चहा पाजणारा सांगवीकर वर्षाचा शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर, ज्युनियर च्या वर्षात वाहत जातो. पैशाची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसेवाल्या मित्राबरोबर राहून सर्वांनपासून अलिप्त होत दूर जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर दिसतो आणि मग शेवटी पेपर सोडून शिक्षणाला राम राम ठोकून गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंद्याला शिव्या देत थोडे फार त्यातलेच काम करत, इतर शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूल दिवस ढकलणारा, आता जे होईल ते हो मग का चिंता करा अशा पराभूत तत्व ज्ञानाशी येऊन पोचलेला पांडुरंग इतकीच कोसलाची कथा म्हणून मला हे पुस्तक जास्तीत जास्त आवडले.
भूमिका मंदार गावकर
इयत्ता :- ९वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मला आवडलेले पुस्तक-कोसला
मी आजपर्यंत अनेक पुस्तकं वाचली, पण मला त्यातले काही मोजकेच पुस्तक आवडले. त्यातले एक पुस्तक म्हणजे "कोसला". कोसला हि एक कादंबरी आहे. हि कादंबरी भालचंद्र नेमाडे या लेखकाने लिहीली आहे. मला ही कादंबरी खूप आवडते. कारण त्या कादंबरीत त्या लेखकाने त्यांच्या जीवनात घडलेल्या सर्व घडामोडीचा आढावा घेतला आहे. त्या कादंबरीत लेखकाने त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेचा खुलासा केला आहे.
कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणा-या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मय प्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
कोसला चा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप, गांव, सगेसोयरे यांना नाकारतो. अशा व्यक्तिमत्वावरील कथा असलेली 'कोसला' ही कादंबरी प्रस्थापित कादंब-यांचे स्वरुप, विषय, भाषाशैली, संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली. 'कोसला' ने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचीक केली. आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीची वैशिष्ट्य आहे.
शंभारातील नव्याण्णवास मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच एवढी भन्नाट सुरू होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त. वर लिहिलेली ओळ ह्याच पहिल्या पानावरची. 'कोसला' म्हणजे 'कोष'.
कुठल्यातरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वतःची कथा सांगायला सुरू करतो. कथा घडते मुख्यत्वेकरुन ५९ ते ६३ च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडणं, मुळची त्रास देण्याची वृत्ती, वडिलांची शुल्लक गोष्टीतली लांडी-लबाडी, खोटारडेपणा आणि ह्यात तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान व वरुन घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टाळत 'व्यक्तिमत्व घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर गॅदरींगला कल्चरल सेक्रेटरी होऊन पदरचे पैसे खर्च केलेला सेक्रेटरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत 'चमकण्याच्या मागे असलेला सांगवीकर घरुन येणा-या पैश्यांची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या गेलेल्याला चहा-सिगरेटी पाजणारा सांगवीकर, मेस सेक्रेटरी असताना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर इंटरच्या आणि ज्युनिअरच्या वर्षात वाहत जातो. मनू मेल्याचे दुःख पचवण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैश्याची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात न खुळखुळवणाच्या मित्रांबरोबर राहूनही एकूणातच सर्वांपासून अलिप्त होत, दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो. आणि मग शेवटी एकूणच परीक्षेत पेपर सोडून शिक्षणाला रामराम ठोकून, गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंदा-कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम बघत, इतर अश्याच शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसाचे दिवस ढकलणारा, आता जे होईल ते होवो, सगळेच भंकस, मग का चिंता करा अश्या पराभूत तत्वज्ञानाशी येऊन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कथा.
*
कु. सेजल प्रसाद वराडकर
८ वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
लेखक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
पुस्तके म्हणजे माणसांचे मित्र. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात. आपल मनोरंजन करतात. बुद्धिमता वाढवतात म. गांधीजी म्हणतात माझ्या सोबत कुणीही नसेल व एखादे पुस्तक असेल तरही मी एकाकी नसणार. पुस्तकांसारख्या माणसाचा दुसरा मित्र नाही.
पुस्तकातून आपल्याला त्या-त्या लेखकाचे मोठेपण दिसून येते. त्याची विद्वता समजते. पुस्तके प्रेरणा देतात. भगतसिंग सारखे राष्ट्रभक्त गीता वाचूनच देशासाठी प्राणार्पण करायला तयार झाले. लोकमान्यांचे ‘गीतारहस्य' जगाने डोक्यावर घेतले. असंख्य पुस्तके आजपर्यंत लिहिली गेली. तरीसुद्धा मला भावलेल, आवडलेल पुस्तक म्हणजे भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने लेखक विनायक दामोदर सावरकर ज्यांच्या विचाराने, लेखनाने व कतृत्वाने देशाला सावरलं. स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना मिळाली.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. आपला खरा इतिहास समजेल. आपले पूर्वज काय होते त्याचे भान येईल. भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे ‘यदा यदा ही धर्मस्य ...... प्रत्येक आक्रमणाच्या वेळेला आपले वीर कसे उभे राहिले व परकीय आक्रमणे कशी परतवून लावली ते ज्ञात होईल. भारताला लाभलेल्या नररत्नांचा परीचय होईल. एका एका गुणासाठी, ध्येयासाठी व तत्वांसाठी आपले बलिदान दिले. सम्राट चंद्रगुप्त राजा पोरस, सम्राट अशोक, शाहीवाहन, शिवाजी महाराज अशा एकापेक्षा एक सरस नरवीरांच्या प्रताप आणि पराक्रमाचा परिचय होईल.
ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य करायचे म्हणून आपल्या संस्कृतीच नसल्याचे लेखन केले. भारतीय नेमळट, भित्रे व पुळकुटे असल्याचा दावा केला, तो सर्व हे. पुस्तक वाचल्यावर किती खोटा आहे तो समजतो. ‘लोळ तेजाचा, छावा मी चैतन्याचा' याची प्रचिती येते. मेंढ्यात राहून जसा सिंह मेंढी बनतो, तशी आपली अवस्था आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच आपली छाती अभिमानाने फुलून येईल. आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान वाटेल व हे राष्ट्र देवतांचे, राष्ट्र प्रेषितांचे याचा अनुभव येईल.
हे पुस्तक प्रत्येक भारतीयांच्या घरी संग्रही असलेच पाहिजे. हे पुस्तक म्हणजे जणू वाघीणीचे दूधच हे पुस्तक वाचल्यावर आपण कुणाची औलाद आहोत हे समोरच्यांना पण समजेल. हे पुस्तक वाचून व प्रेरणा घेऊन आपण देशभक्तीचा असा पराक्रम करुया की सातव्या सुवर्ण पानावर आपलं नाव कोरल जाईल.
काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर तर हे पुस्तक अधिकच महत्त्वाचे वाटते. जगज्जेता अलेकझांडर या देशातच पुरु सारख्या स्वाभिमानी राजाकडून पराभूत झाला. हे आपण विसरता कामा नये.
हे पुस्तकं ज्यांनी लिहिले ते स्वतः पण एक विरच होते. पुस्तक होणी लिहिलं ते पण महत्त्वाचं त्यांना जन्मठेपेची झाली होती. पण आपल्या इतिहासाचे स्मरण असल्यामुळे त्यांनी अनेक कठिण प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली. खासकरुन फ्रांस बंदरातून पलायनाचा प्रयत्न.
या पुस्तकाआधी अनेक पुस्तके लिहिली गेली, भविष्यात पण लिहिली जातील पण हे पुस्तक तर 'न भूतो न भविष्य' ती असेच आहे. तुम्ही सर्वांनी पण ते वाचा आणि अनुभव घ्या. वाघीणीचे दूध प्या व गगनभेदी डरकाळी फोडा, जी सा-या जगाला ऐकू जाऊ दे. खरचं दुर्लभं मारते जन्मः।।
स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे -
उत्तिष्ट, जागृत, प्राप्त वरानी बोधतः उठा, जगा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
कु. अदिति सतिश बारसकर
इयत्ता –८वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
मला आवडलेले पुस्तक
'द सायन्स ऑफ गेटिंग रिच' पुस्तकाचे एक अनोखे विश्व असते. पुस्तके नेहमीच जगण्याला दिशा देत असतात.
जगण्याला नवा आयाम देतात. काही पुस्तके तर अक्षरक्षः वेड लावतात. आपल्याला दीपस्तंभ ठरलेले पुस्तक इतरांनीही वाचावे आणि त्यांच्या आयुष्यातही बदल व्हावा असे आपल्याला मनापासून वाटते. मग त्यांना आवर्जुन ते पुस्तक वाचायला सांगतो. तसे सांगण्यांत अथवा ते पुस्तक भेट देण्यात एक वेगळाचं आनंद असतो. असेच मला आनंद देणारे व खुपचं भावलेले पुस्तक म्हणजे 'सायन्स ऑफ गेटिंग रिच' त्याचे लेखक आहेत 'वालेसडी वाटक्स' लेखकाच्या म्हणण्यानुसार श्रीमंत होण्यासाठी एक शास्त्र आहे, विज्ञान
आहे. त्यात जसे प्रयोगअंती अनुमान मांडले जाते. त्याचप्रमाणे शास्त्रीय दृष्टीकोन आपण ठेवत
गेलो तसेच काही सुत्रे पाळली गणितीपद्धतीप्रमाणे आपण नक्कीच श्रीमंत होऊ शकतो ज्यांनी
'सिक्रेट' हे पुस्तक वाचले त्यांना हे पुस्तक सहज समजते.
मुख्य म्हणजे १०० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे आणि काकाच्या कसोटीवर ते सिद्ध झालेले पुस्तक आहे अतिशय वास्तववादी दृष्टीकोन त्यातून दिसून येत आहे आणि
त्यातून वैयक्तिक यशाबरोबर आर्थिक साक्षरता शिकविली जाते. नव्या पिढीला हा समृद्धीचा अभिनव मार्ग नक्कीच रोचक आहे. असे काही वैश्विक नियम पुस्तकात नमूद केले आहे की, त्यामुळे मनाला भेडसावणारी आर्थिक असुरक्षितता दूर होणार आहे. आज आपण जे काही समृद्धीसाठी करणार आहोत. त्यात नवीन काही नसून पूर्वीपार तेच तत्व लागू पडत आहे. त्यासाठी कल्पनात्मक अभिनव विचार प्रक्रिया गरजेची आहे. प्रत्येकाने ठराविक मार्गाचा अवलंब मात्र केला पाहिजे. तुम्ही आज जिथे आहात तिथून सुरुवात करा.
भूतकाळ सोडून द्या आणि श्रीमंतीकडे वाटचाल असू द्या हे अतिशय साध्या-सोप्या भाषेत सांगितले आहे. त्यामुळे हे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवते. आपली इच्छाशक्ती खूप प्रबळ असली पाहिजे. आपण जसा विचार करतो तसेच आपण घडत असतो. एक विचार्तात्वा जे जळीस्थळी काष्टी आहे. त्यात आपल्या विचारांचे रोपण करा आणि ध्येयापर्यंत पोहोचा विचारातून आकार साकार होतो. केवळ १०० पानांचे हे पुस्तक असून शेवटी दिलेला सारांशही खूप उपयुक्त आहे. अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी असे हे पुस्तक असून
प्रत्येकाने आपल्या घरात अवश्य संग्रही असू द्यावे असे हे पुस्तक आहे.
कुठलयाही पानापासून सुरुवात केली तरी हरवल्यासारखे वाटत नाही.
कु. मनाली योगेश गवाणकर
इयत्ता :-८वी
जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण*
No comments:
Post a Comment