Monday, February 25, 2019

संतांचे चरित्र-ज्योती बिराजदार

मला आवडलेले पुस्तक

आपल्याला सर्व काही आवडतं पण ते आपल्या मनासारखं असलं तरच. उदाहरणार्थ :-  पुस्तक. पुस्तक वाचल्याने कोणत्या गोष्टीचा विकास होतो? तर सृजनशीलता, कल्पनाशक्तीचा विस्तार, नवनिर्मिती, शब्दांची दिशा, त्यातील प्रसंग अनुभव इत्यादी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.

माझं आवडत्या पुस्तकाचे नाव आहे :- 'संतांचे चरित्र्य' या पुस्तकातून मला खूप काही शिकायला मिळालं. निस्वार्थपणाने केलेली जनांची सेवा, त्यांचे सद्गुण, विवेकी विचार इत्यादी गोष्टी मला शिकायला मिळाल्या. महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. मी वाचलेल्या या संतांच्या चरित्रामध्ये संतांनी काय करावे, काय करू नये, पुण्यमार्ग कसा आचरावा, लोकांसोबत कसे वागावे या सर्व गोष्टी मला शिकायला मिळाल्या. माझे योग्य पथ मला कळाले आणि या सर्व गोष्टी वाचून किंवा ऐकून नाही तर त्याप्रमाणे वागणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून तर म्हणतात,  "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे."

ज्योती बिराजदार
इयत्ता- ८वी
विवेकवर्धिनी कन्याशाळा

 

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...