सैनिक
सैनिक लढतात त्या सिमेवर म्हणुन मिळते आपल्याला सुख पोटभर ।।धृ।।
त्याला चिंता नाही स्वतःची
दिनरात्र झटतो त्या सीमेशी
लोक देत नाही मुलगी त्याला करण्यासाठी लग्न
पण कलत नाही आपल्याला त्याच्यामुळे टळतात विघ्न
आराम नावाची गोष्ट नाही त्याच्या जीवनभर
म्हणुन मिळते आपल्याला सुख पोटभर ।।१।।
जेवढा असतो सैनिकाला मान
तेवढे नाही पद्मभूषण मिळाल्यावर समाधान
त्याला आशा नसते पुरस्काराची
त्याची जबाबदारी असते केवळ देशरक्षणाची
हजारो सैनिक होतात त्या सीमेवर
म्हणून मिळते आपल्याला सुख पोटभर ।।२।।
आपण केला पाहिजे त्याचा थोडा विचार
एक सैनिक शाहिद झाल्यावर झाले पाहिजे हजारो सैनिक तयार
छातीवर झेलले त्याने हजारो हत्यार
म्हणून मिळते आपल्याला सुख मिळते पोटभर ।।३।।
एका कवितेतून सांगता येत नाही त्यांची महती
नाव ऐकल्यावर त्याचे अंगात येती स्फूर्ती
त्यांचे कार्यच आहे फार महान
कारण लढतात सीमेवर जवान
मला करता येणार नाही त्याचे कार्य व्यक्त आयुष्यभर
म्हणून मिळते आपल्याला सुख पोटभर ।।४।।
अतुल सातव
इयत्ता- ७ वी
जि. प.शाळा,लवळे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
उत्कृष्ट कविता , यावयातही इतकी समज भाषाशैलीही ऊत्तम आहे पुष्कळ अपेक्षा आहेत भरपूर शुभेच्छा💐💐💐💐💐
ReplyDelete