Monday, February 25, 2019

जय गणेश इंग्लिश स्कुल,मालवण-३४ कविता

बालसैनिक

‘या रे या बालजवान, देशासाठी घेऊ आण, सैनिक होऊ देशासाठी, देशासाठी हो लढणार.
अमुचा भारत देश हा, नाही दुस-या परक्याचा, जर का कोणी केला हल्ला, त्यांना आम्ही मरण देणार. देशासाठी हो लढणार.
परक्याशी सारे आम्ही, कधी न घेऊ आता कट्टी, करूनि एकी घेऊ गट्टी, रक्षण देशाचे करणार. देशासाठी हो लढणार
हिंदु, मुस्लिम, शीख, इसाई, सगळे आम्ही भाई भाई, भेद विसरूनी एकी करूनी, स्वातंत्र्याला हो जपणार. देशासाठी हो लढणार देशासाठी हो लढणार

रावजी प्रशांत राणे
इयत्ता-६ वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

अमर जवान

कितीतरी जवान मरण पावले देशाच्या सीमेवर, या जवानांचं नाव गाजतेय देशाच्या तिरंग्यावर.

सुंदर स्वराज्य निर्माण केले बंदुकीच्या गोळीवर, अन् जवानांच नाव गाजतेय देशाच्या तिरंग्यावर.

देशासाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, अन् जवानांच नाव गाजतेय देशाच्या तिरंग्यावर,

प्राणपणाने लढले जवान भक्ती अपुल्या देशावर अन् जवानांच नाव गाजतेय देशाच्या तिरंग्यावर.

कितीतरी जवानांनी बलिदान दिले या भारत देशासाठी । अन् जवानांच नाव गाजतेय देशाच्या तिरंग्यावर.

आम्ही सलाम करतो या अमर जवानांसाठी अन् जवानांच नाव गाजतेय देशाच्या तिरंग्यावर.

रूद्राक्ष केशव कांदळकर
इयत्ता -६
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

रक्षण करण्यासाठी खूप कष्ट घेता तुम्ही, रात्रभर जागतात शांतीने झोपतो आम्ही.

हा सलाम सैनिक हो तुमच्या या कर्तृत्वाला, हा सलाम सैनिक हो तुमच्या या देशभक्तीला.

पूर्ण ताकद लावून लढता त्या सीमेवर, गरज पडता, गोळी झेलता या छातीवर.

करून शत्रुचा खात्मा सुरक्षा देता आम्हांला, करतो वंदन आज तुमच्या पराक्रमाला.

तुमच्यामुळे आजही आहे तिरंग्याची शान, करतो सलाम आज वाटतो हा अभिमान.

भूमी भालचंद्र राऊत
इयत्ता -७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

सैनिक जातात सीमेवर आपल्या रक्षणसाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी भारतातल्या भारतीयांसाठी ।। १ ।।

मरणाशी झुंजतात आपल्यासाठी लढतात ते शत्रुवर मात करून जीवाचे बलिदान देतात ते ।। २।।

स्वत:ची नाती सोडून दुस-यांची नाती जपतात अंगावर गोळी झेलून हसत प्राण सोडतात ।। ३।।

चित्रा प्रशांत फणसेकर
इयत्ता -७ वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

तो सैनिक या देशाचा

तो भारताचा अलौकिक वीरपुरूष तो भारताचा खरा योद्धा तो पुत्र एका आईचा तो सैनिक या देशाचा ।। १ ।।

तो भारताचा शूर तो भारताचा वीर तो भाऊ एका बहिणीचा तो सैनिक या देशाचा ।। २।।

ज्यांनी देशाचा तिरंगा फडकवला ज्यांनी देशाचा मान ठेवला तो वीर या देशाचा तो सैनिक या देशाचा ।। ३।।

कृतिका अजय गावठे
इयत्ता -६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

खाकी वर्दीतील शूर जवान शिपाई सांभाळतील सीमा, हद्द आणि लढाई

करतील रक्षण साच्या दुनियेचे विसरतील सण, उत्सव आपुल्या घराचे

वेळ देतील आपुल्या देशाच्या रक्षणाला विचार न करता घराच्या पालन पोषणाला

निधड्या छातीने सामोरे जातील शत्रूला वीर झुंजला झुंजला रे ईमानदारीने जिंकला

देशभक्ती, देशप्रेम, देशनिष्ठा ठायी यांच्या मना कर्तृत्वाच्या अमर गाथा आठवतील जना

अशा या शूरवीरांना करूनी वंदन मनी होतसे आनंद मुखी अभिनंदन

नेहा श्रीगुरू प्रभू
इयत्ता -६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

देशाचे रक्षण करणे प्राणाचे बलिदान देणे कधीही मागे न हटता देशासाठी निडरपणे लढणे हेच तुम्हा ठावे सैनिक हो तुम्हीच रक्षणकर्ते आमुचे

कुटुंबियांपासुनी होऊनी दूर देशसेवेचे घेऊनी व्रत जागे अहोरात्र सीमेवर सांभाळण्या आमुचे जीव सैनिक हो तुम्हीच, रक्षणकर्ते आमुचे

सुखाची झोप, सुखाचे जगणे अनुभवतो आम्ही तुम्हांमुळे लक्ष लक्ष उपकार तुमचे आम्हांवरी भारतमातेचे रक्षण होते तुम्हांमुळे सैनिक हो तुम्हीच, रक्षणकर्ते आमुचे

सदैव सीमेवर पहारा तुमचा वाचविण्या जीव आमुचा शत्रूचा पराभव करून मानाने फडकविता तिरंगा आमुचा सैनिक हो तुम्हीच, रक्षणकर्ते आमुचे

रोशन रामचंद्र पराडकर
इयत्ता - ७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

सैनिक करतो देशाची रक्षा म्हणून मिळते सर्वाना सुरक्षा सैनिक असतात देश रक्षक त्यांच्या जीवावर उठून शत्रू झाले भक्षक

सैनिक असतो देशाचा मावळा, त्याला लागला देश रक्षणाचा लळा, शहीद होतो तो देशासाठी आपल्या, दु:खी होतात सारे परिवारातील त्याच्या

सैनिक जातो आपल्या कुटुंबापासून दूर, शहीद झाल्यावर येतो सर्वाच्या डोळ्यात पूर त्याचा असतो एकच नारा निसर्गाशी तडजोडपणे देतो पहारा

लढतात ते निडरपणे, म्हणून लागते आपल्याला झोप शांतपणे, अहोरात्र तो करतो कष्ट, सतत असतो शत्रुवर कटाक्ष

स्वानंदी नारायण तळाशिलकर
इयत्ता -७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिकाला श्रध्दांजली

तिरंग्याची शान राखलात तुम्ही सीमेवर युध्दा केले तुम्ही, देशासाठी जीवनदान दिले तुम्ही तुम्हाला वाहतो श्रध्दांजली आम्ही

सुखाची झोप लागते आम्हांला देशप्रेमाची ओढ जेव्हा लागते तुम्हाला, शहिद होता देशासाठी तुम्ही, तुम्हांला वाहतो श्रध्दांजली आम्ही

जेव्हा देशासाठी होता तुम्ही अमर जवान तेव्हा तुम्हाला मिळतो परमचक्काचा मान, देशासाठी दिली कुर्बानी तुम्ही, तुम्हांला वाहतो श्रध्दांजली आम्ही

स्वानंदी नारायण तळाशिलकर
इयत्ता -७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक एक ........

सैनिक एक अमर जवान, सैनिक एक देशभक्ती करणारा.
सैनिक एक देशासाठी बलिदान देणारा,

सैनिक एक देशाला जीवनदान देणारा. भारतासाठी रक्षण करणारा, देशासाठी प्राण घेणारा.

देशसेवा करणारा जवान,
बंदूक घेऊन हल्ला करणारा. देशासाठी लढला हिम्मतने, सीमेवर जाऊन शत्रुशी लढणारा.

आम्ही तुमचा अभिमान करू, आम्ही तुमचा गर्व करू.

पूनम बजरंगलाल सैनी
इयत्ता-६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सीमेवरती बांधवा.......

भावनांचा बांध माझा आज येथे फुटला सीमेवरती बांधवा, श्वास तुझा सुटला ।

झोपतो निश्चिंत मी तुझ्या भरवशावर दिवस रात्र पहारा करतेस तू सीमेवर भूमातेच्या रक्षणा तू प्राण तुझा वेचला सीमेवरती बांधवा, श्वास तुझा सुटला ...

लावतो फटाके आम्ही दिवाळीत आनंदाचे पण लावतोस तू सीमेवर पहारे रक्षणाचे मरण दाराशी असता ही तू पाय टाकला सीमेवरती बांधवा श्वास तुझा सुटला.....

असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत तू पराक्रम तुझा गाजवलास सैनिका पराक्रम तुझा गाजवलास शत्रुशी झुंज देता तू वीर मरण पावला सीमेवरती बांधवा, श्वास तुझा सुटला....

सलाम तुला भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणाच्या आमच्या उदयासाठी आपला आज देणा-या सीमेवरती बांधवा श्वास तुझा सुटला.....

अनुश्री संजय वराडकर
इयत्ता -७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतो म्हणून तो आपल्या कुटुंबापासून दूर राहतो सैनिक आपल्या देशासाठी बलिदान देतो सैनिक अहोरात्र कष्ट देशासाठी घेतो.
जो निडरपणे आपल्या छातीवर बंदूक ठेवून लढतो. जो स्वत:ची पर्वा न करता लढतो तो खरा जवान.
जो देशासाठी प्राणाशी झुंज देतो सुखाच्या सोईपासून दूर राहतो जो देशाला आपला देव मानतो तोच सैनिक व मानकरी
जो बर्फावर झोपतो व झोपडीत राहून देशभक्ती करतो तोच खरा सैनिक जो शत्रूशी झुंज देऊन देशाचे रक्षण करतो तोच खरा सैनिक

समृध्दी सुखानंद कांबळी
इयत्ता – ७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

प्रिय सैनिक आहेत आपल्या मातृभूमीची शान, वंदन करून आपण सर्व देऊ त्यांना मान. दिवस-रात्र करीत असतात आपल्या देशाचे रक्षण करू तेवढे कमी आहे त्या सैनिकाचे वर्णन

देशाच्या संरक्षणासाठी घेतात कुटुंबाचा निरोप त्यांच्यामुळे आपल्या देशाला लागते सुखाची झोप सुख-सोईची नाही त्यांना नाही कसली गरज शत्रूचा पराभव करतात, अभिमान वाटतो मज.

अहोरात्र कष्ट करून जीवाशी ते लढले देशासाठी लढताना प्राण गेले तेव्हा आसू माझे ओघळले नि:स्वार्थीपणा त्यांचा नडतो शत्रूनांच अन् या नि:स्वार्थीपणाचा अभिमान आहे देशाला

तिरंग्याचा मान राखुनी ते ठरले अमर जवान देशसेवेचे व्रत जपूनी झाले ते बलिदान प्राणार्पणाने लढूनी त्यांनी दिला देशासाठी प्राण श्रध्दांजली वाहतो त्यांना वाटे त्यांचा अभिमान

निनाद प्रसाद आरोंदेकर
इयत्ता –७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मी सैनिक बोलतोय

मी आहे सैनिक... लढतो जीवाशी दैनिक देतो जीवाचे बलिदान सांगा माझ्या आईला, मरेपर्यंत लढेन न मानून हार .....

नि:स्वार्थीपणा बालगुनी प्राणाशी झुंजेन शेवटच्या क्षणापर्यत न मरता लढेन सांगा माझ्या बाबांना धीर धरा थोडाफार मरेपर्यंत लढेन न मानून हार

सुख–सोई नको मला, देश हाच देवा हवा शत्रुचा पराजय करून बाळगेन थोडा हेवा सांगा माझ्या दादाला, माझे बलिदान आहे उदार मरेपर्यंत लढेन न मानून हार

गरज लागेल माझी जेव्हा, सदैव राहेन मी उभा सांगा माझ्या देशाला, सतत रहा निडर मरेपर्यंत लढेन न मानून हार

श्रावणी किशोर तारी
इयत्ता –७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

झपझप पाऊल टाकू चला सैन्यात भरती होऊ चला

हाती बंदूक घेऊ चला ठो, ठो बार उडवू चला

शत्रूवर हल्ला चढवू चला छेशाचे रक्षण करू चला

तोफा रायफल घेऊ चला विमान रणगाडा चालवू चला

बॉम्ब बॉम्बवर फेकू चला शत्रूचा नाश करू चला

शत्रूला हाकलून देऊ चला विजय मिळवून परत चला

मातृभूमीला मान देऊ चला तिरंगा आमचा फाडकवू चला

ओकार सुमंत तोंडवळकर
इयत्ता – ७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

सीमेवरील सैनिकांनी दिले देशासाठी प्राण शहीद होता होता समजावून गेले आम्हांला हिम्मतीचे ज्ञान ज्यांनी दिली

देशासाठी कुर्बानी त्यांची वाहू श्रध्दांजली सदा आठवुनी
खाकी वर्दी घालून दिले बलिदान देशासाठी त्या सर्वाचा गर्व आहे त्यांच्या शौर्यासाठी

स्वत:च्या ईमानदारीने घेतात आमची जबाबदारी अशक्य असले तरी तिरंगा उंच गगनावरी

असे हे शूर वीर शत्रूशी झुंजतात
आणि आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य करतात देशसेवेसाठी सुखी संसाराचा त्याग करून देशातील सर्वांना जीवनदान देतात

काजल संजय लुडबे
इयत्ता -६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

कितीतरी जवानांनी बलिदान दिले भारत देशासाठी पण आपण त्यांना श्रदांजली देतो मान राखण्यासाठी
प्राणपणावर लढले जवान भरोसा ज्या देशावर जवानांनी शत्रुशी झुंज करून बंदूकीच्या गोळीवर
जे जवान देशासाठी प्राण देऊन शहिद झाले ज्या मातृभूमीवर पाकिस्तान वर हल्ला करून आणि भारताला स्वातंत्र्य करून देतात
कितीतरी जवान शहीद झाले भारत देशासाठी म्हणून आम्ही सलाम करतो या जवानांसाठी

अथर्व तुषार अमरे
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

एकच सैनिक येथे जन्मला भारत या देशात त्या वीराचे नाम गाजले या मातेच्या हृदयात
सुंदर भारत निर्माण केला देश भक्तीच्या जोरावर देशासाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर
सैनिकांनी बाजी लावूनी देश आपला घडविला लढले हे वीर प्राणपणाने विश्वास त्या तिरंग्यावर

अथर्व अजित पार्दै
इयत्ता –६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

खरा सैनिक

देशासाठी लढणारा देशासाठी बलिदान देणारा सुख-सोई पासून दूर राहणारा देशाचा तो सैनिक खरा

हिरा आहे तो देशाचा देशभक्त तो मातृभूमीचा शत्रूचा पराजय करणारा देशाचा तो सैनिक खरा

अहोरात्र कष्ट घेणारा वीर आहे तो जीवाशी खेळणारा शूर आहे तो आम्हाला सुखाची झोप देणारा देशाचा तो सैनिक खरा

सतत शत्रूवर लक्ष ठेवणारा प्राणाशी झुंज देणारा देशाचे रक्षण करणारा देशाचा ता सैनिक खरा

ऊर्जा नितिन साळगांवकर
इयत्ता –७वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक कानमंत्र झाला

देशभक्ती अन् देशप्रेमाचा झरा सदा वाहिला सैनिका तू देशासाठी प्राण तुझा अर्पिला तुझ्या त्यागाचा हा पराकम मनी माझ्या भावला अन् सैनिका रे तूच माझा कानमंत्र झाला

आठवला मला तो दिवस झालास तू सैन्यात भरती घेतली होतीस आण भारतामाता ही एकच मूर्ती गेले शरण तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या शुरतेला अन् सैनिका रे तूच माझा कानमंत्र झाला

शत्रूशी झुंजताना दिलेस हसत हसत जीवनदान घेतली तेव्हा मी प्रेरणा वाटूनी अभिमान जयजयकार भारतमातेचा केलास शेवटच्या श्वासाला अन् सैनिका रे तूच माझा कानमंत्र झाला

फडकवण्यासाठी देशाचा उंच उंच गगनी। दिले बलिदान तुझ्यासारखे अनेक जणांनी केली प्रार्थना देवाकडे लाभो असेच जवान या देशाला अन् सैनिका रे तूच माझा कानमंत्र झाला

तन्वी सचिन दिघे
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मी सैनिक

अनुभवतो मी सैनिकाचे प्रेम माझ्या देशावर लढतो तो झेलूनी अनंत गोळया अंगावर

रक्षितो देशास माझ्या लढनी अजरामर घडविता शौर्य गाथा होऊनिया वीर

प्रामाणिकपणे कार्य करूनी होतो मी शूर देशासाठी प्राण देऊनी लढतो सीमेवर

घरच्या आठवणीने येतो भरून ऊर। तरीही जातो फडकवाया तिरंगा उंचावर

कुर्बान आहे मी माझ्या देशावर शत्रुशी युद्ध करूनी ठेवतो देशाची मान वर

देशप्रेमासाठी शत्रुशी करतो युद्ध प्राण गेले तरी बत्तर सोडत नाही जिद्द

संपूर्ण देशाला कुटुंब मानुनी सर्वांचे रक्षण करतो मी माझ्या वीर-बांधवांना त्रिवार मुजरा करतो

ऋतुजा गुरूनाथ शेलटकर
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

अमर जवान

हे सैनिकहो खाकी वर्दी तुम्ही घालता बंदूक हातात घेऊनी सीमेवर उतरता शत्रूशी झुंज करूनी देशासाठी प्राण देता अमर जवान शहीद होऊनी रक्षण देशाचे करता

गर्व आम्हा वाटतो तुमचा वीर जवानांनो जिद्द धरूनी ईमानदारी राखूनी पळवता शत्रूना गाजवूनी मोठी जबाबदारी तुम्ही तिरंगा फडकवता अमर जवान शहीद होऊनी रक्षण देशाचे करता

हजारो गोळया अंगावर तुम्ही झेलता हया मातृभूमीस अभिमान वाटतो तुमचा प्राणाशी लढनी आम्हांस सुखी जीवन देता अमर जवान शहीद होऊनी रक्षण देशाचे करता

जिद्द धरूनी निसर्गाशी तडजोड करता देशसेवा करूनी कुर्बानी तुम्ही देता सुखाचा त्याग करूनी आम्हांस सुखाची झोप देता अमर जवान शहीद होऊनी रक्षण देशाच करता

सानिया सुरेश नाईक
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक - अमर जवान

देऊनी देशासाठी अनंत जन्मे बलिदान अजरामर सैनिक तू रे अमर जवान
सतत लढतो राखूनी ईमानदारी ध्यानी ठेऊनी आपली जबाबदारी सीमेवर लढनी करितो आमुचे रक्षण

सराव करूनी शिस्तीने संचलनाचे रक्षण करतात नेमाने वतनाचे देशासाठी झुंजतात अमुचे वीर जवान
कधी न सोडिती लढण्याची जिद्द शत्रूशी लढुनी होतात ते शहीद या शौर्याचा आम्हा वाटतो अभिमान

सर्वाच्या रक्तात पेरले लढण्याचे बीज बलिदानी होऊन ही होते कष्टाचे चीज भारतभूसाठी त्याने अर्पण केले प्राण
मनात सदा ठेवितो आपुल्या देशभक्ती सगेसोयरे विसरतो अन् अपुली प्रिती देशसेवेसाठी तनमन धन अर्पण

जुही संतोष सावजी
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

देश रक्षणार्थ उचलला त्यांनी विडा त्यासाठी सांडवला रक्ताचा सडा मातृभूमीच्या प्रेमासाठी तिरंगा लहरत राहण्यासाठी कुर्बानी दिली त्यांनी देशासाठी

जो लढला रात्रंदिवस थंडी असो वा पाऊस वादळ असो वा ऊन निसर्गाशी तडजोड करीत सीमेवर उभा आहे छाती ठोकून

शत्रूशी झुंज देत लढती मातृभूमीचे वीर सुखाची झोप होऊनी सीमेवर स्थिर आई, मुले, पत्नी यांची कितीही आली आठवण या सगळयाच्या पलीकडे जाऊन सर्वस्व मानले वतन

देशासाठी लढले जिद्दीने उभे राहाणे ही तर सवय आहे त्यांची जुनी गर्व आहे आम्हा त्या शहिदावर त्यांनी देशासाठी दिली आपली कुर्बानी

सोहम पंकज लाड
इयत्ता –६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

तो सैनिक

जे दिवस रात्र जागतात जे ईमानदारीने लढतात जे सुखाचे जीवन जगायला देतात ते शूर वीर होतात

जे स्वतंत्रतेसाठी लढतात जे सुखाची झोप देतात जे आपली जबाबदारी घेतात ते शूर वीर होतात

जे देशसेवेसाठी जगतात जे त्यागासाठी लढतात जे आपले रक्षण करतात ते शूर वीर होतात

जे सीमेवर जगतात जे निसर्गाशी तडजोड करतात जे शत्रंशी झुंजतात ते शूर वीर होतात

जे आपला तिरंगा झळकवतात जे जिद्दीने लढतात जे देशासाठी बलिदान देतात ते शूर वीर होतात ते शूर वीर होतात

आर्या संजय कांबळी
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

हे सैनिक तुच आमचा जीवनदाता बलिदानी होतोस शत्रूशी झुंजता वाटतो आम्हाला अभिमान तुझा सदा कारण तू करतोस आमचे रक्षण सदा

सैनिक असतो देशाचा मावळा तुलाच असतो देश रक्षणाचा लळा देशासाठी तू आपल्या परिवारापासून दूर राहतोस आणि तू आमच्या परिवाराचे रक्षण करतोस

तू खाकी वर्दी घालून सीमेवर उभा राहतोस निसर्गाशी तडजोड होऊनही सहनशील राहतोस तू सुखाचा त्याग करतोस तू आम्हाला सुखी ठेवतोस

ना काळाचे भान, ना कधी वेळेचे भान अशी आहे तुमची शान, जो आपल्या छातीवर आगीचा गोळा झेलतो तो एक आदर्श जवान असतो

आम्ही करतो तुम्हाला प्रणाम आम्ही करतो तुम्हाला सलाम भारतमातेच्या शहीद झालेला वीर पुत्रांना श्रध्दांजली अर्पण करतो

युतिका हेमेंद्र मेस्त
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

आपला सैनिक

अरे देशासाठी लढतो रे माझा वीर जवान
आपल्या देशासाठी देतो रे
आपले बलिदान वीर झुंजला
झुंजला इमानदारीने जिंकला
त्याचा विजय पाहून आम्ही तिरंगा फडकवला

गोळया झेलतोस तू अंगावर
हिम्मत दाखवतोस तू सीमेवर
आम्हांस ठाऊक आहे तुला
आठवण येते घरची
तरीही रक्षा करतोस तू आमची

कधी रखरखत्या उन्हात
कधी गार–गार थंडीत
आपल्या जिवाची चिंता न करता
लढतोस तू देशासाठी

ना कधी काळाचे भान करतोस तू
जिवाचे रान लढतोस तू
सीमेवर म्हणून तुला माझा मानाचा सलाम

रश्मी राजन अंबरे
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

सैनिक आला सैनिक आला तो आपली रक्षा करणार देशासाठी शहीद होणार तो आहे आपला रक्षक देशासाठी झटणार

सैनिक आला सैनिक आला घालून आला सैनिकाचे कपडे डोक्यावर सैनिकाची टोपी हातामध्ये बंदूक तो आहे शूरवीर करणार देशाची राखण

सैनिक आला सैनिक आला पूर्ण नजर ठेवणार घ्याया आमची काळजी आणि असते जाण कर्तृत्वाची

आयुश विनोदकुमार सैनी
इयत्ता –४थी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

वीर जवान

जवान आहात तुम्ही वीर उंच पर्वत तिरंगा फडकवता तुम्ही आतंकवादयांशी लढता तुम्ही सुखाची झोप आम्हांस देता तुम्ही

दिवस असो वा रात्र रक्षण करता तुम्ही गरमी असो वा थंडी सदैव पहाण्यासाठी आई असो वा बाबा करतो तू त्यांची आठवण तरी तू लढतो त्यांच्यासाठी घेऊन बंदूक हाती शत्रूशी तू झुंजतो शत्रू किती मोठा असो विजय तू मिळवतो सर्वाना सांगून जातो परत नक्की येणार कधी विजयी होऊन येतो तर कधी तिरंग्यात लपेटून येतो
श्रध्दांजली वाहायला येताता मोठे नेते सैनिक आणि कुटुंब तुझे भारताच्या मनात रहाते तुझी आठवण । तुला घालुनी पुष्पहार नेते देतात श्रध्दांजली असे आमुचे वीर जवान करतात आमुचे रक्षण

धीरज रमाकांत येरागी
इयत्ता –६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

जाऊ दे नं वं

आई मला सीमेवर जायचंय जावू दे नं वं
आई मला सीमेवर जायचंय जावू दे नं वं
आई मला लढायला जायचंय जावू दे नं वं
आई मला देश रक्षण करायचंय जावू दे नं वं
आई मला तिरंगा उंचवायचंय जावू दे नं वं
आई मला अमर व्हायचंय जाव दे नं वं

दयानंद संजय कांबळी
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

आम्ही वाहतो श्रध्दांजली

सैनिक किती शूर तुम्ही तुमची आठवण येते आम्हां तुम्ही आमच्यासाठी सीमेवर लढता म्हणुनी आम्ही वाहतो श्रध्दांजली तुम्हां

तुमच्यावर हल्ले होतात तरी तुम्ही लढता विचार न करता प्राण देशासाठी देता। बंदुक घेऊनी हाती बलिदान होता म्हणूनी आम्ही वाहतो श्रध्दांजली तुम्हां

आम्हाला वाटतो अभिमान तुमचा जीवाचा त्याग करूनी सदैव तुम्ही लढता शत्रुशी झुंज देशासाठी तुम्ही करता म्हणून आम्ही वाहतो श्रध्दांजली तुम्हां

तुम्ही आहात म्हणूनी जगतो आम्ही सुखाने तिरंग्याचा मान राखण्या लढता हिंम्मतीने शूरता तुमची येते फळाला म्हणूनी आम्ही वाहतो श्रध्दांजली तुम्हां

गार्गी लक्ष्मण पाटकर
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

सैनिक

देशासाठी लढतात ते सैनिक
प्राण अर्पण करतात ते सैनिक
देश भक्ती करतात ते सैनिक
देशासाठी लढतात ते सैनिक
देशाचे रक्षण करतात ते सैनिक
देशसेवा करतात ते सैनिक
देशासाठी लढायला हिंम्मत करतात ते सैनिक
देशासाठी लढतात ते सैनिक
देशावर प्रेम करतात ते सैनिक
सीमेवर जातात ते सैनिक
शत्रूशी लढतात ते सैनिक
देशासाठी लढतात ते सैनिक
वीर असतात ते सैनिक
अमर असतात ते सैनिक
जबाबदार असतात ते सैनिक
देशासाठी लढतात ते सैनिक
मातृभूमीचा अभिमान करतात ते सैनिक
तिरंगा उंचावतात ते सैनिक
देशाचे नाव उज्ज्वल करतात ते सैनिक

प्रणव सुनिल चव्हाण
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

भारताचे जवान

वीर तुम्ही देशासाठी झटता आमुचे रक्षण दिवस रात्र करता खाकी वर्दी घालून देशासाठी लढता वीर तुम्ही आमुच्यासाठी शत्रूशी झुंजता
जवान तुम्ही वीर आहात उंच पर्वतावर तिरंगा फडकवतात आतंकवादयांशी तुम्ही लढता सुखाची झोप आम्हांस देता
आतंकवादी आले किती लढता भारतासाठी दिले बलिदान तुम्ही देशासाठी जिद्द तुमची आहे देशासाठी लढलात तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी
घेऊन बंदूक हातीत शत्रूशी तू झुंजतो शत्रू किती मोठा असो विजय तू मिळवितो भारताच्या मनात राहते तुझी आठवण असे आमुचे वीर जवान करतात आमुचे रक्षण

आर्यन अनिल वराडकर
इयत्ता – ६वी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

आमचे प्रिय सैनिक

जे देशासाठी लढले जे देशासाठी झटले
आणि रक्षण अमुचे केले ते सैनिक हो, ते सैनिक हो, ते सैनिक हो
जे देशप्रेमी बनले जे देशभक्त बनले आणि रक्षण अमुचे केले ते सैनिक हो, ते सैनिक हो ते
जे निसर्गाशी चांगले नि:स्वार्थीपणे वागले
आणि रक्षण अमुचे केले ते सैनिक हो, ते सैनिक हो, ते सैनिक हो
आभार या सैनिकांचे जे अहोरात्र लढले आणि रक्षण अमुचे केले ते सैनिक हा, ते सैनिक हो, ते सैनिक हो,

लिशा प्रकाश कांबळी
इयत्ता – ७वी

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

1 comment:

  1. What a creativity!! Very nice 👌👌👌👌Beautiful

    ReplyDelete

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...