भारत भूच्या वीरा
असंख्य घेऊनि छातीवर तू वार
ये भारत भु च्या वीरा तुलाच माझा पहिला नमस्कार ।।धृ।।
देशासाठी करुनी शत्रूंचा संहार
पण झिजतो तूच फार
तुलाच उघडते ते मोक्षाचे दार
ये भारत भु च्या वीरा तुलाच माझा पाहिला नमस्कार।।१।।
सीमेवर तूच शत्रूंना मार
स्वतःच होऊनी ठार
पण कोण ठेवते तुजला तो फुलांचा हार
ये भारत भु च्या वीरा तुलाच माझा पहिला नमस्कार।।२।।
मातृभूसाठी होऊनी ठार
जातो देशापासून तू दूर
पण जातानाही लावतो जयहिंदची ललकार
ये भारत भू च्या वीरा तुलाच माझा पहिला नमस्कार।।३।।
रोहन राजाराम क्षीरसागर
इयत्ता- ७ वी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
उत्तम भाषाशैलीही छान अनेकानेक शुभेच्छा💐💐💐💐💐
ReplyDeleteउत्तम भाषाशैलीही सुरेख ,अनेकानेक शुभेच्छा💐💐💐💐💐
ReplyDelete