सैनिक
जशी लेखकाला लेखणी
तशी सैनिकाला बंदूक होय,
रोज जीवाची पर्वा न करता
तो सीमेवर लढाया जाय.
भारतीय सैनिक खरंच
आहेत खूप महान,
ते रोज झेलतात असे वार
जे नसतात कधीच एकसमान.
आपल्या शूर जवानांना
मनापासून दिली पाहिजे दाद,
कारण शत्रूला ते,
करून टाकतात बरबाद.
सैनिकांचा लढा फक्त
शत्रूशीच नाही तर
निसर्गाशीही असतो,
त्यांच्या कर्तव्याची परीक्षा पाहण्याचा
त्याचा डाव नेहेमीच फसतो.
आपल्या सर्वांना आहे,
भारत मातेसमान
हे सैनिक रक्षक आहेत
आपल्या पित्यासमान
सैनिक करतात प्रत्येक हल्ला
गोळीबाराने साजरा
म्हणून त्यांच्या शौर्याला
मी करतो मानाचा मुजरा
निलय सहस्रबुद्धे
इयत्ता ७ वी
न्यू इंडिया स्कूल,कोथरूड
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment