पुस्तकाचे नाव-ऐंशी दिवसात जगाची सफर
मूळ लेखक-ज्यूल्स व्हर्न
पुनःकथन-जेन एस.कपूर
चित्रकार-कोलीन गिब्सन
अनुवाद-सुभाष भेंडे
ऐंशी दिवसात जगाची सफर हे पुस्तक अगदी छोटे आहे म्हणजे एक कथा १९ भागांमध्ये असलेली. प्रत्येक वेळी ही कथा एखाद्या टीव्ही सिरीयल प्रमाणे बदलत जाते त्यामुळे पुढे पुढे वाचवीशी वाटते.
या कथेत हिरो फिलीस फॉग आणि त्याचा नोकर पॅसेपार्टूट, त्यांचा पाठलाग करणारा फिक्स आणि सती जाण्यापासून वाचलेली भारतीय स्त्री आवडा यांचा समावेश आहे.
कथेतील कथानक थोडक्यात देते. फॉगला पॅसेपार्टूट भेटतो. फॉग मित्रांना चॅलेंज करतो की ऐंशी दिवसात जगाची सफर करेन आणि त्याप्रमाणे निघतो.त्यादरम्यान त्याच्यावर चोर म्हणून शंका घेऊन त्याचा पाठलाग करणारा गुप्त पोलीस भेटतो. या सफरीत तो भारतात येतो तेव्हा नवऱ्याच्या मृत्यू नंतर सती जाणारी आवडा भेटते तिला तो वाचवतो आणि आपल्यासोबत जगाची सफर पूर्ण करून लंडनमध्ये घेऊन येतो.
लंडन मध्ये येताच फिक्स त्याला अटक करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला त्याची चूक कळते आणि फॉग सुटतो.फॉग या सर्वांना घेऊन मित्रांना भेटायला क्लब मध्ये जातात तिथे आवडाची ओळख करून देतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो. आवडा ही आनंदाने स्वीकारते. अशी थोडक्यात कहाणी आहे.
या पुस्तकात या ऐंशी दिवसात फॉगला येणाऱ्या संकटांची मालिका आणि त्यातून फॉगची सुटका हे वाचतांना मज्जा येते.अजून पुढे काय अजून पुढे काय असा suspence लागतो आणि आपण पुस्तक वाचून काढतो.
या पुस्तकाची भाषा साधी आणि सोपी आहे. मला सतीची कथा जास्त आवडली कारण मला सती जाणे माहीत होते पण इथे अजून जास्त वर्णन केले असल्याने अधिक माहिती मिळाली.शिवाय भारताचे वर्णन आपले आले. अतिशय हलके फुलके पुस्तक असल्याने मला हे पुस्तक अधिक आवडले.
कलिका पाटोळे
इयत्ता-७ वी
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर
धन्यवाद
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
कलिका छान लिहिले आहे ,तुझी वाचनाची आवड अशीच जप
ReplyDelete