Monday, February 25, 2019

सोडुनिया घराचा पाश-चिन्मय वेलणकर


सोडुनिया घराचा पाश


करी शत्रुंचा नाश।।

घराचा सोडूनी लळा

आठवीशी तुज बाळा

सामोरी जाशी काळा

संसारातून उठशी बाळा ।।

झेलतो गोळ्यांचे वार

करी देशाचा उद्धार

देता देशासी बलिदान

झेंड्यात गुंडाळून प्राण ।।

पुलावामावर झाला हल्ला भ्याड

शुर सैनिक घेतील त्याचा सुड

सीमेवर सदैव सज्ज 

सण सोहळे त्यांस त्याज्य ।।

वाट पाहती जवान, तुमचे परिवार

त्यागमुर्ती तुम्ही, करा स्वीकार

 आमचे प्रणाम त्रिवार ॥

शहीद सैनिक हो 

व्यर्थ न गेले तुमचे बलिदान

स्फुर्ती घेऊन तुमच्या पासून

नवयुवक देशरक्षणा होती सदैव तय्यार ।।


चिन्मय वेलणकर
इयत्ता-७ वी
वामनराव मुरांजन हायस्कूल, मुलुंड पूर्व

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन



No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...