Monday, February 25, 2019

या जन्मी फौजी बनले-श्रेया कुंभार

या जन्मी फौजी बनले

लक्ष तुझे एकच झाले
या जन्मी फौजी बनले।।धृ।।

घरदार तू सोडले
आईला किती जपले

बायको मुलांना सोडले
तुम्ही या जन्मी फौजी बनले।।१।।

चिंता न तुला या घराची
चिंता न तुला तुझ्या संसारची
चिंता रे तुला या देशाची
लक्ष तुझे एकच होते सेवा करावी देशाची।।२।।

बर्फात तुम्ही लढले
वार किती झेलले
किती हो खाली पडले
पण लढत लढत राहिले।।३।।

भारत देशाची तुम्ही शान
तुम्हांस आहे किती हो मान
तुम्ही आहात किती हो महान
तुम्हीच आमुचे शाहिद जवान।।४।।

तुम्ही लढता त्या सीमेवर 
वार झेलले छातीवर
आणि झाले अमर वीर
माझा तुला पहिला नमस्कार।।५।।

श्रेया विजय कुंभार
इयत्ता-७ वी
जि. प. प्राथमिक शाळा लवळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...