Monday, February 25, 2019

प्रेमळ भूत-जान्हवी नाकती

मला आवडलेले पुस्तक

प्रेमळ भूत

लेखक- रमेश तांबे.

मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव 'प्रेमळ भूत' आहे. त्या पुस्तकाचे लेखक राजीव तांबे आहेत.मला हे पुस्तक खूप खूप आवडले. पुस्तकात एका प्रेमळ भूताची गोष्ट सांगितलेली आहे आणि हे भूत सर्वांची मदत करते.

आपण लहानपणा पासून भूतांच्या गोष्टी ऐकत आलो आहोत.अंधार झाला वा विज गेली तर आपल्याला भूताची आठवण येते,भिती वाटते,देवाचा धावा सुरू करतो. आपल्या मनात भूताबद्दल खूप भीती आहे,त्याला आपण वाईट समजतो पण भूत वाईट नसतो या पुस्तकातून हेच आपल्याला सांगितलेले आहे.भूत प्रेमळ देखील असते आणि हे भूत चांगल्या माणसांची नेहमी मदत करते.भूतं ही काही वाईट नसतात.असे या पुस्तकातून सांगितले आहे.

 या पुस्तकात प्रेमळ भूतांनी मुलांची कशी मदत केली ते या पुस्तकात सांगितले आहे. माझ्या मते हे पुस्तक जर सर्वांनी वाचले तर भूतांबद्दलची भीती मनातून निघून जाईल.या पुस्तकात खूप गंमत-जंमत आहे.वाचताना खूप मज्जा येते.पुस्तकात भूत हे न दिसणारे आहे.

खर सांगू तर भूत हे नसतात असे मला वाटते.म्हणून मी भूतांवर विश्वास ठेवत नाही.या पुस्तकातून हे समजते की आपण सर्वांशी प्रेमानी वागले पाहिजे. आणि सर्वांना मदत केली पाहिजे...

🌹सर्वांची मदत करा आणि नेहमी प्रेमानी वागा.🌹


कु: जान्हवी अनिल नाकती
इयत्ता-आठवी

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन


No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...