एक होता गोल्डी
अॅक्टर डायरेक्टर हे शब्द उच्चारले की एक गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे ग्लॅमर. उच्च राहणीमान, मोठ्या मोठ्या गाड्या आणि बरंच काही. हा समज खोटा ठरवणारं माझं आवडतं पुस्तक म्हणजे एक होता गोल्डी. देव आनंद यांचे हे छोटे भाऊ. यांचं खरं नाव विजय आनंद. ते एक डायरेक्टर होते. त्यांनी देव आनंद आणि अनेक अभिनेत्री - अभिनेत्रांसोबत काम केलं. ज्वेल थिफ, गाईड सारखे मोठे मोठे चित्रपट केले. त्यांचं हे चरित्र अनिता पाध्ये यांनी लिहिलं आहे. त्यांनीच लिहिलेलं चरित्र का वाचायचं? तर अनिता पाध्ये, ह्या गोल्डी यांच्या शेवटच्या काही काळात खूप चांगल्या मैत्रिण होत्या. त्या त्यांना भेटायच्या, गोल्डी सुद्धा त्यांच्याशी खूप मोकळेपणाने गप्पा मारायचे. त्या गप्पांमधूनच उलघडत गेलेलं त्यांचं आयुष्य, अनिता पाध्ये यांनी पुस्तकात चरित्र स्वरूपात मांडलं आहे.
अत्यंत प्रामाणिकपणे आणि साधेपणाने हे चरित्र लिहिलेलं आहे, असं मला वाटतं. गोल्डी यांच्या लहानपणीपासूनच्या घटना त्या चरित्रात आहेत. त्यांच्या सगळ्यात मोठ्या भावाच्या बायकोसोबत त्यांचे कसे संबंध होते, त्यांनी गोल्डी यांचा कसा संभाळ केला, इथपासून त्यांनी कुठला चित्रपट कसा केला, त्यावेळी कशा गमती जमती झाल्या, काही चित्रपटांचं क्रेडिट कसं त्यांच्यापासून काढून घेतलं गेलं, इथपर्यंत सगळं निष्पक्षपणे या चरित्रात मांडलं गेलं आहे असं मला वाटतं. अजुन खूप साऱ्या गोष्टी या चरित्रात आहेत.
कलाकाराला किती बाजू असतात हे जाणून घेण्यासाठी हे चरित्र नक्की वाचावं...
शंतनु शर्मिष्ठा शिंदे
शाळा- होमस्कूल्ड
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment