शेरलॉक होम्स
मला साहसी कथांमध्ये खूप रस आहे .त्यातही मला जगप्रसिद्ध म्हणून ओळखला जाणारा शेरलॉक होम्स हा डिटेक्टिव्ह आवडतो .त्याची पुस्तके मला पंचपक्वनाच ताट वाटत आणि ते ताट मी ३-४ फस्त करते. त्याची पुस्तक वाचताना माझे भान हरपतात.
शेरलॉक होम्स हे एक काल्पनिक पात्र आहे .त्याचे लेखन सर आर्थर काँनन डायल यांनी इंग्रजीमधून केले आहे. मी काही दिवसांपूर्वी शेरलॉक होम्सच्या साहसी कथा हे पुस्तक १०व्यंदा वाचले.त्याचा अनुवाद डॉ कमलेश यांनी मराठीतून केला आहे. त्याचे पब्लिशिंग जयको पब्लिशिंग यांनी केले आहे.
शेरलॉक होम्स हा तीक्ष्ण नजरेचा होता .त्याची स्मरणशक्ती ,निरीक्षणशक्ती,तर्कशक्ती चांगली होती .ह्या पुस्तकात एकूण 12 प्रकरण आहेत . 12 च्या 12 प्रकरणं मला फार आवडतात. पण मला नील माणिक हे प्रकरण खूप आवडते, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.ही घटना 1883 मधील आहे , ख्रिसमसचा दुसरा दिवस होता. वॉटसन होम्सला शुभेच्छा द्यायला आला होता . वॉटसन हा त्याचा मित्रा होता, अरे! वॉटसन मी जेव्हा स्टेशन जवळून येत होतो, तेव्हा मला एक गृहस्थ दिसले, त्या गृहस्थाच्या हातात एक मेलेले बदक व टोपी होती काही मुलं त्याच्यावर धावून आली व तो गृहस्थ मेलेला बदक व टोपी सोडून पळून गेला. तितक्यात पिटसन नावाचा एक पोलीस तिथे आला व त्याने तो मेलेला बदक आणि टोपी माझ्या हातात देऊन गेला, मे त्याला विचारले हे मेलेले बदक तुला माहीत आहे का कोणाचे आहे ? तो म्हणाला मला माहित नाही त्यावर होम्स म्हणाले हे मेलेले बदक तू घरी घेऊन जा ,ते बदक तू रात्रीचे जेवण म्हणून खा नाहीतर ते सडून जाईल. होम्स ला टोपीवर मिसेस हेन्री बेकर लिहिले होते , ते दिसले, दुसऱ्या दिवशी पिटसन त्याच्या घरी आला व होम्स ला म्हणाला ,होम्स या बदकाच्या पोटामधून माझ्या बायकोला हिरा सापडला !!, तेवढ्यात होम्स म्हणाला हा हिरा नाही आहे हा नील माणिक आहे ,
त्या नंतर दुसऱ्याच दिवशी पेपरात एक बातमी आली आणि ती बातमी म्हणजे नील मणीकाची चोरी झाली होती , बातमीत सांगितले होते की राज महालामध्ये काम करणारा जेम्स रायडर यांच्या स्नानगृहातील नळाची दुरुस्ती करण्यासाठी जॉन हॉर्नरला पाचारण केले होते तेव्हा त्याने चोरी केली असावी असे सांगितले जात आहे , त्याच्या विरुद्ध साक्ष देण्यात आली आहे , शेरलॉक होम्स आणि वॉटसन यांनी भरपूर शोध लावला , तेव्हा त्यांना कळले नील माणिकची चोरी करणारा दुसरा कोणीही नसून राजमहालात काम करणारा जॉन रायडर याने केली होती ,
शेरलॉक होम्सच्या कथा वाचतांना पुढे काय होईल याची उत्सुकता मला वाटते, त्याचे पुस्तक वाचताना मे माझी तहान भूक विसरते , शेरलोवक होम्स चे नाव ऐकताच क्षणी माझ्या डोळ्यांसमोर ताच्या पुस्तकातील प्रकरणाची नावे येतात, जणू काही मला त्याचे व्यसनच लागले आहे.
प्रांजल अत्तरदे
इयत्ता-७वी
स्वामी विवेकानंद हायस्कुल,डोंबिवली
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment