फौजी सैनिक
लाखात एक आमचा देशरक्षक फौजी
त्याच्या जीवावर करतो आम्ही मौजी।।धृ।।
सोडूनि घरदार सोडून सुखी संसार
खेळतात प्राणावर देशाच्या सीमेवर।।१।।
मरण येते तुम्हां देशाच्या रक्षणात
तुमच्यासाठी तुमच्या घराची चिंतितात।।२।।
लढता लढता तुम्हां येते वीरमरण
तुमच्या बलिदानाचे आम्ही करतो स्मरण।।३।।
त्याला भीती कशाची ज्याने देशासाठी नाती वाहिली
त्याच्या बलिदानाने अमर ज्योती उजळीत राहिली।।४।।
त्याच्या बलिदानाने जगतो आम्ही आरामात
त्याचे वीरमरण राहतील सदा स्मरणात।।५।।
नाही चिंता स्वतःची उभे सैनिक सीमेवर
लढता लढता झेलतात गोळ्या छातीवर।।६।।
सीमेवर राहणे हेच त्यांचे घर
कोणी करत नाही त्यांचा विचार।।७।।
कधी न डगमगता घेता तुम्ही भरारी
या भरारीत कोण साथ देते का गहिवरी।।८।।
सीमेवर देता तुम्ही प्राणांचे बलिदान
तुम्ही करता तुमच्या जिवाचं रान।।९।।
लाखात एक आमचा देशरक्षक फौजी
त्याच्या जीवावर करतो आम्ही मौजी।।१०।।
©शितल ज्ञानेश्वर कुंभारे
७वी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment