Monday, February 25, 2019

सैनिक दादा-आर्या पांगम

सैनिक दादा, तुम्ही आहात म्हणून....


    या भारतभूचे शूर वीर तुम्ही

     करतो मान तुमचा आम्ही,

     या देशासाठी लढता लढता

     अर्पण करता प्राण तुम्ही...१


    ऊन ,वारा,पाऊस झेलता

    सीमेवर कडक पहारा देता ,

    शेवटचा क्षण आला तरी

    नाही घाबरत शत्रूला तुम्ही...२

    

    सैनिक दादा ,सैनिक दादा

    या भारतभूची शान तुम्ही,

    हेच अभिमानाने सांगतो

     साऱ्यांना आम्ही.........३


 आर्या राधाकृष्ण पांगम 

चौथी

गांधी बाल मंदिर ,कुर्ला.


धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन



No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...