जरीही झाला जीवनान्त,
पुन्हा घेईल जन्म अनंत.
प्रत्येक जन्मी लढेन मी देशासाठी,
बनेन देशाची आधाराची काठी.
आशा नाही कोणी गाईल माझे यशोगान,
फक्त एवढीच अपेक्षा सफल व्हावे माझे बलिदान.
शेवटच्या क्षणालाही नाही धास्तावणार कोणाला,
रियासतीचे करेल नामस्मरण शेवटच्याही श्वासाला.
असा असतो सैनिक शूर आणि अभिमानी,
आपण राहू त्याचे सदैव ऋणी.
आर्या सर्जेराव माने.
इयत्ता- ७ वी.
कुमुद विद्यामंदिर,देवनार
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
सुरेख, भाषाशैली उत्तम आहे , शुभेच्छा💐💐💐💐
ReplyDelete