सैनिक
माते समान देशासाठी
झटावे लागते सैनिकाना
देशाच्या प्रगतीसाठी
जिवाची पर्वा नसते त्यांना
घरदारासी सोडून जाऊन
उभे असतात सीमेवर
आनंदाने रक्षण करतात
गोळ्या झेलित छातीवर
ज्यांच्यामुळेच जगतो आपण
सणवार साजरा करीत
ते मात्र पळतात कटाकुट्यात
देशाची सेवा करीत
ऊन,वारा,पाऊस यांचे
भान नसते तयांना
देशरक्षणासाठी जे तत्पर
तयार असती बलिदाना
केले अर्पण देशासाठी
ज्यांनी आपल्या मुलांना
प्रमाण माझा हात जोडूनी
अशा थोर माता पित्यांना
सर्वेश प्रशांत मांडे
इयत्ता ६ वी
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय,पुणे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment