Monday, February 25, 2019

श्रीमान योगी-ईशा महल्ले

पुस्तकाचे नाव - “श्रीमान योगी'

लेखक - रणजित देसाई

रणजित देसाईंनी लिहिलेलं श्रीमान योगी' हे पुस्तक. शिवचरित्राची आपल्याला सफर घडवून आणतं. लहानपणापासूनचे शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांचं प्रत्येक रूप एकेक करून आपल्यासमोर उलगडत जातं.

या पुस्तकात अत्यंत बारीक तपशिलासहीत प्रसंग लिहिले गेले आहेत. त्यांची वर्णन अत्यंत बारकाईने करण्यात आल्री आहेत. मग ते शिवजन्माच्या आधीचं असो
किवा शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाचं असो, अत्यंत चपखल असं वर्णन. पण ते केलेलं वर्णन वाचताना कुठेही नाटकीपणा जाणवत नाही.

रणजित देसाई यांनी शिवराज्यभिषेकाचा सोहळा उत्तम रितीने रंगवला आहे.राज्याभिषेकातील प्रत्येक विधीचे वर्णन केले आहे. ते वाचताना आपण त्या सोहळ्याचे
साक्षीदार झालो आहोत असे वाटते.

शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, गनिमी कावा या सगळ्या गोष्टी आपल्यालाहे पुस्तक वाचल्यावर कळंत. त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी घेतलेले श्रम, कष्ट,
सहन केलेला त्रास हे सर्व वाचताना डोळ्यात पाणी येतचं. त्यांच्यातील अनेक पैलू आपल्यासमोर येत जातात. आणि आपण ते आपल्या मनात साठवत जातो.

पण एवढं सगळ करूनही शेवटच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांना झालेला त्रास पाहिला की मग तो राज्याबद्दलचा- दरबाराचा असू दे अथवा घरातील असू दे.मनात विचार येतो की एवढं करूनही शिवाजी राजांना दुःख का भोगावं लागलं असावं.

रणजित देसाई यांनी ज्या ताकदीने शिवाजीमहाराजांचे आनंदी क्षण, सुखी समाधानी

ईशा महल्ले
इयत्ता-९वी
माधव सदाशिव गोळवलकर शाळा

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...