भारतमातेला करीत नमन
उभे आहे जवान
देशासाठी घरदार सोडले,
शत्रूला पळवून लावले.
किती झाले बंदुकांचे वार,
पण कधी न घेतली माघार.
हातात बंदूक पाठीवर ओझे तरी करीते आपले रक्षण,
चला सर्व मिळूनी करू त्यांस वंदन.
जेव्हा आपण साजरी करितो संक्रात पाडवा दिवाळी,
तेव्हा ती खेळत असतात रक्ताची होळी.
सिंहासारखे ते लढले,
देशासाठी प्राण सोडले.
अशा जवानांना माझा लाख लाख प्रणाम!!
संस्कृती दिलीप कुंजीर
इयत्ता -५ वी
जि.प.प्राथमिक शाळा तारमळा
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment